Stock Market : वॉरेन बफे यांनी बाजारातून काढले 277 अब्ज डॉलर्स; शेअर बाजारावर मंदीचं संकट?
Warren Buffett Berkshire : जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करून रोख रक्कम जमा करत आहेत. त्यांची कंपनी बर्कशायरने सध्या सुमारे 276.9 अब्ज डॉलर रोख स्वरुपात जमा केली आहे. गुंतवणुकीनंतर उरलेल्या पैशातून लोकांना नेहमी खर्च करण्याचा सल्ला देणाऱ्या वॉरन बफे (Warren Buffett) यांची ही भूमिका अवघ्या जगाला आश्चर्यचकित करणारी आहे.
शेअर बाजारात तेजी, राहुल गांधी मालामाल, अवघ्या 5 महिन्यांत कमावला 46.5 लाखांचा नफा
कंपनीकडे असलेली रोकड आता तिच्या एकूण मालमत्तेच्या सुमारे 25 टक्के आहे. जून 2025 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा कंपनीने आपली 25 टक्के मालमत्ता रोखीत ठेवली आहे. बर्कशायर हॅथवेने अलीकडेच अॅपल आणि बँक ऑफ अमेरिका (बोफा) मधील शेअर्स विकले. यानंतर, कंपनीकडे असलेली एकूण रोकड आणि रोख समतुल्य 276.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले. यावरून असं सूचित होतं की इक्विटी मार्केटचे उच्च मूल्यांकन लक्षात घेता वॉरेन बफे सध्या गुंतवणूक करणं टाळत आहेत.
बर्कशायरने 3 ऑगस्ट रोजी सांगितले की त्यांनी Apple Inc. मधील आपली हिस्सेदारी सुमारे 50% कमी केली आहे आणि जुलै महिन्यात बँक ऑफ अमेरिका मधील आपला हिस्सा 8.8% ने कमी केला आहे. दरम्यान, बर्कशायर हॅथवेच्या रोख होल्डिंगवर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. इक्विटी मार्केट ट्रॅकिंग फर्म कोबे लीटरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘x’ वर विचारलं की बफेट मंदीची अपेक्षा करत आहेत का?
बर्कशायरच्या रोख राखीव रकमेत गेल्या दोन वर्षांत जवळपास दुप्पट वाढ झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. रोख होल्डिंगमध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिकेत मंदीची शक्यता आहे. तेथील जॉब मार्केटही कमकुवत दिसत आहे. बफेट सतत शेअर्स विकून पैसे काढण्यामागील हे एक कारण असू शकतं की त्यांना भविष्यात कॉर्पोरेट कर वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेतील मंदीची भीती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर वॉरन बफे यांची ही भूमिका आणखीनच अस्वस्थ करणारी आहे. याशिवाय कॉर्पोरेट टॅक्स हे शेअर विक्रीचे प्रमुख कारण मानले जात आहे.