Download App

गुजरातमध्ये रामाच्या मिरवणुकीवर दगडफेक, प्राणप्रतिष्ठेपूर्वी तणाव वाढला

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये (Gujarat) काढण्यात आलेल्या श्रीरामाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या.

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मिरवणूक काढण्यात येत असताना मेहसाणा जिल्ह्यात ही घटना घडली. मात्र ही यात्रा मेहसाणा येथे पोहोचताच काही लोकांनी छतावरूनच दगडफेक सुरू केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली, ही दिलासादायक बाब आहे.

हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि बळाचाही वापर करण्यात आला. मात्र नंतर 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी अद्याप सुरू आहे. पोलिसांनी सांगितले केली की स्थानिक पातळीवरील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे आणि शांतता प्रस्थापित झाली आहे.

ह्रदयात राम अन् हाताला काम, हे हिंदुत्व; आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं पण…; ठाकरे गटाची BJP टीका

मात्र, काही दिवसांपूर्वी अशीच घटना मध्य प्रदेशात घडली होती. वातावरण बिघडवण्यासाठी प्रभू रामाच्या पोस्टरशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी तरुणाने त्या घटनेचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

follow us