चार वेळा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने मोठे काम नाही, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

चार वेळा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने मोठे काम नाही, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती (Baramati) तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून मोठ्या योजना राबवल्या जात आहेत. इतिहासात आजपर्यंत असे काम झालेले नाही. आपल्याला अनेकदा मोठी पदे मिळाली. चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, पण अशाप्रकारे योजना आल्या नव्हत्या, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता केला.

अजित पवार म्हणाले, चार वेळा मुख्यमंत्रीपदासह अन्य महत्त्वाची पदे भूषवूनही बारामतीत फारसे काम झाले नाही. दुर्दैवाने मोठ्या योजना मंजूर होऊ शकल्या नाहीत. पण मी त्याकडे लक्ष दिले आहे. एकट्या बारामतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत 65 कोटींची कामे सुरू असून, वस्त्रोद्योग मंडळाकडून 9 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. बारामती बाजार समितीचा सेस फंड किती आहे, इतर बाजार समित्यांची आज काय स्थिती आहे याची माहिती घ्या, अशी माहिती त्यांनी दिली.

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ, जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकणी ईडीकडून समन्स, मंगळवारी होणार चौकशी

बाजार समितीने सुपा येथे जागा घेतली. पण ती खड्ड्यात होती. तेथील तलावाच्या खोल करणादरम्यान ती जागा भरुन काढली. सुपा आणि सुपा परगणा गावांमध्ये रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांची 1000 कोटींची कामे सुरू आहेत. लोक विश्वास ठेवणार नाहीत. एका आमदाराला वर्षभरात 5 कोटींचा निधी मिळतो, हजारो कोटींची कामे येथे सुरू आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

देशातला सर्वात मोठा भ्रष्ट मुख्यमंत्री कोण? जुन्या मित्रावर राहुल गांधींचा हल्लाबोल

सुदैवाने 30-32 वर्षांच्या राजकीय जीवनात तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. खासदार, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी पदे त्यातून मिळाली. त्या अनुभवातून मी खूप काही शिकलो. कोणतेही विकास काम कसे पुढे घेऊन जायचे, निधीची तरतूद कशी करायची, कामांचा अंदाजपत्रकात समावेश कसा करायचा, पुरवणी मागणीतून निधी कसा आणायचा हे समजले. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, भटके विमुक्त समाज, बेघर लोकांसाठी घरबांधणी कार्यक्रम इत्यादींसाठी पुरेसा निधी आणला असल्याचे ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube