रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ, जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकणी ईडीकडून समन्स, मंगळवारी होणार चौकशी

  • Written By: Published:
रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ, जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकणी ईडीकडून समन्स, मंगळवारी होणार चौकशी

Ravindra Waikar : गेल्या काही दिवसांपासून ईडीने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना समन्स पाठवले. शुक्रवारी रोहित पवार (Rohit Pawar) आणि किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं होते. त्यानंतर आता जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनाही ईडीने समन्स (Summons by ED) पाठवलं आहे. त्यामुळं वायकरांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना मंगळवारी (23 जानेवारी) रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

Ram Mandir : ‘शेमारू’च्या ‘श्री राम भक्ती उत्सव’ अल्बमचे मोरारी बापूंच्या हस्ते प्रकाशन 

यापूर्वीही ईडीने वायकर यांच्या निवासस्थानी धाड टाकून त्यांना समन्स बजावले होते. तेव्हा त्यांनी आजारी असल्याचं कारण देत चौकशीला गैरहजेरी लावली. मात्र, तेव्हा रवींद्र वायकरांनी कोणताही वैद्यकीय चाचणीचा पुरावा दिला नव्हता. त्यामुळं पुन्हा एकदा वायकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय. ईमेलद्वारे हे समन्स बजावलं.

सईच्या पहिल्या-वहिल्या डान्स रिलचा सोशल मीडियावर धुमाकूळ!, डान्स मुव पाहून चाहत्यांकडून कौतुक 

जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्यात मोठे आर्थिक व्यवहार झालेत. शिवाय, वायकर यांनी हॉटेलसाठी या भूखंडावर जे जे बांधकाम सुरू केले, ते तथ्थ लपवून केल्याचा ईडीची आरोप होता. या भूखंडाचे गैरव्यवहार वायकर यांच्या मुलीच्या खत्यावरून झाले. त्यामुळं त्यांच्या मुलीला देखील ईडीची नोटीस जाण्याची माहिती समोर येतेय. तसंच या प्रकऱणात वायकर यांच्या मुलीचीही चौकशी होऊ शकते. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्याविरुध्द तक्रार केली होती. जोगेश्वरी येथील एका हॉटेल संबंधात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवले.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यामुळं त्यांच्यावर ईडीकडून छापे टाकले जात आहेत, असंही बोलल्या जातं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube