Download App

आई आहे की राक्षशीण! पोटचा गोळा संपवला अन् मृतदेह बॅगेत भरुन निघाली पण..,

Suchna Seth : गोव्यातील एका हॉटलेमध्ये आपल्या चार वर्षीय मुलाला संपवून त्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जात असतानाच एका महिलेला अटक करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सूचना सेठ (Suchna Seth) असं या महिलेचं नाव असून गोवा पोलिसांच्या माहितीनंतर कर्नाटक पोलिसांना महिलेच्या बॅगमध्ये मुलाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेनंतर ही आई आहे की राक्षशीण? असा सवाल उपस्थित होतोयं.

Shirur Loksabha Seat : पार्थ पवार आज दिवसभर हडपसरमध्ये : शिरूरचं जवळपास ठरलंय!

बेंगळुरूच्या एका स्टार्टअप कंपनीच्या महिला सीईओने गोव्यातील एका हॉटेलमध्ये तिच्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर तिने मृतदेह पिशवीत भरला आणि टॅक्सीने बेंगळुरूला रवाना झाली. गोवा पोलिसांच्या माहितीनंतर कर्नाटक पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या महिलेजवळ असलेल्या बॅगेतून मुलाचा मृतदेह सापडला आहे.

सुचना सेठ (३९) असे महिलेचे नाव असून ही महिला माइंडफुल एआय लॅब या स्टार्टअप कंपनीची संस्थापक, सीईओ आहे. गोव्यातील सोल बन्यान ग्रांडे हॉटेलमध्ये 6 जानेवारीला आपल्या मुलासह आल्याची माहिती आहे. सोमवारी (8 जानेवारी) त्यांनी हॉटेलमधून चेक आऊट केले होते. सुचना सेठने मुलाची हत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नसून पतीच्या घटस्फोटामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सूचना ही मूळची पश्चिम बंगालची रहिवासी आहे. ती बंगळुरूमध्ये राहायची. तिचा पती केरळचा आहे. तो सध्या इंडोनेशियामध्ये आहे. गोवा पोलिसांनी त्याला भारतात बोलावले आहे.

कोण आहे सूचना सेठ?
सूचना सेठच्या लिंक्डइन पेजनुसार, सूचना एआय स्टार्टअप ‘माइंडफुल एआय लॅब’च्या संस्थापक आणि सीईओ आहेत. सूचना सेठचा 2021 मध्ये AI Ethics मधील 100 सर्वात हुशार महिलांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सूचना सेठ AI नीतिशास्त्रातील तज्ञ आणि डेटा सायंटिस्ट असून हार्वर्ड विद्यापीठासह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये फेलो म्हणून कार्यरत आहेत.

Lok Sabha Election : ‘तर मग भाजपने काय करायचे?’ शिंदे गटाच्या खासदाराचा अजितदादांना सवाल

प्रकरण कसं उलघडलं?
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सोमवारी हॉटेलमधून घटनेची माहिती मिळाली. हॉटेलचे कर्मचारी खोली साफ करण्यासाठी आले असता त्यांना तेथे रक्ताचे डाग दिसले. कर्मचाऱ्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला माहिती दिली. यानंतर गोवा पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, त्यात सूचना सेठसोबत मुलगा हॉटेलमध्ये येताना दिसत आहे. मात्र, चेकआऊटच्या वेळी ती एकटीच होती.

हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी पोलिसांना सांगितले की, सोमवारी महिला तिच्या खोलीतून एकटीच आली आणि बेंगळुरूला टॅक्सी बुक करण्यास सांगितले. कॅबचे भाडे जास्त असेल असे कर्मचाऱ्यांनी महिलेला सांगितले. त्यांनी सूचना यांना विमानाने बंगळुरूला जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने टॅक्सीनेच जाण्याचा हट्ट धरला. कर्मचार्‍यांनी एक टॅक्सी बोलावली, त्या टॅक्सीमधून सूचना बॅगमध्ये मुलाचा मृतदेह घेऊन बेंगळुरूला गेली.

follow us

संबंधित बातम्या