Lok Sabha Election : ‘तर मग भाजपने काय करायचे?’ शिंदे गटाच्या खासदाराचा अजितदादांना सवाल
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. जागावाटपाच्या चर्चांनीही (Lok Sabha Election 2024) वेग घेतला आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या खासदाराच्या वक्तव्याने अजित पवार गटाचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) फक्त चार जागा जिंकल्या होत्या. आता जर राष्ट्रवादीने 22 जागा मागितल्या तर मग भाजपन (BJP) काय करायचं, असा सवाल खासदार कृपाल तुमाणे (Krupal Tumane) यांनी केला आहे. राजकारणात काहीही होऊ शकते एका रात्रीत राजकारणात बदल घडत असतात, असे सूचक वक्तव्यही तुमाणे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.
विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?