Download App

कोविड व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा थेट संबंध?; AIIMS-ICMR चा महत्त्वपूर्ण स्टडी आला समोर

  • Written By: Last Updated:

Sudden deaths’ post Covid not linked to vaccines : अलिकडच्या काळात हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . त्यानंतर, त्याचा कोविड लसीशी (Covid Vaccine) काही संबंध आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. या महत्वाच्या विषयावर आता आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. AIIMS आणि ICMR यांनी हा महत्त्वपूर्ण अभ्यास सादर केला आहे.

बापरे! अमेरिका भारतावर लादणार 500 टक्के टॅरिफ? सिनेटमध्ये नवीन बिल, रशियाबरोबरील व्यापार खटकला..

अहवालात नेमकं काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालात कोविड-19 व्हॅक्सिन आणि तरुणांच्या अचानक मृत्यूमध्ये थेट संबंध नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी वेगवेगळ्या संशोधनांच्या आधारे ही माहिती दिली असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कुणावर करण्यात आला स्टडी

ICMR आणि AIIMS या दोन्ही संस्थांनी केलाला स्टडी मे ते ऑगस्ट 2023 दरम्यान देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये करण्यात आला. हा स्टडी ज्या व्यक्ती  पूर्णपणे निरोगी होत्या परंतु, ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान या व्यक्तींचा अचानक मृत्यू झाला. पण, या सर्वांचा मृत्यू आणि तरूणांमध्ये वाढलेला हृदयविकाराचा धोक्याचा कोव्हिड व्हॅक्सिनशी कोणताही संबंध असल्याचे अभ्यासात दिसून आलेले नाही.

पाच वर्षात कोरोनाचे व्हेरिएंट बदलले मग, व्हॅक्सिनपण बदलली का?; येल विद्यापीठाचं रिसर्च काय सांगतं?

कोविड-19 व्हॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी – ICMR 

जारी करण्यात आलेल्या निवेदनात मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, अचानक हृदयविकाराच्या झटक्याने होणारे मृत्यू अनेक कारणांमुळे होऊ शकतात. यामध्ये अनुवंशशास्त्र, जीवनशैली, पूर्वीपासून असलेले आजार आणि कोविडनंतरची गुंतागुंत यांचा समावेश आहे. ICMR आणि NCDC च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतात कोविड-19 लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. या लसींमुळे गंभीर दुष्परिणाम होण्याची प्रकरणे फारच दुर्मिळ आहेत.

follow us