Sudden increase in suicides of daily wage workers : देशात रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत देशात एक लाखाहून अधिक रोजंदारी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने ही आकडेवारी संसदेसमोर मांडली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) अहवालाचा हवाला देत कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, 2019 ते 2021 या काळात देशात एकूण 1.12 लाख बेरोजगार, कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत.रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यामध्ये (suicides of daily wage labourers) 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात तमिळनाडू, महाराष्ट्र आघाडीवर आहेत. देशात 2021 मध्ये 41672 आत्महत्या झाल्या आहेत.
यात रोजंदारी मजुरांच्या आत्महत्येचे आकडे हे कोरोनाच्या काळातील देखील आहेत, जेव्हा देशात लॉकडाऊन होता आणि या काळात लाखो स्थलांतरित मजुरांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या. देशातील गरीब, श्रीमंत यांच्यातील दरी प्रचंड वेगानं रुदावत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब हे अत्यंत गरीब होत आहेत. देशातील गरिबांना बेरोजगारी, दारिद्रय यांनी घेरले आहे. कोरोना महामारिचा सर्वांत मोठा फटका रोजंदारी करणाऱ्या असंघटीत कामगारांना बसला.
हाताला काम नसल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली. जगणं अवघड झाल्यानं बहुतांश कामगारांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. 2019 ते 2021 या काळात देशात एकूण 1.12 लाख रोजंदारी मजुरांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. कामगार मंत्री म्हणाले की, या काळात 66,912 गृहीनींनी, 53,661 स्वयंरोजगार, 43,420 पगारदार आणि 43,385 बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 41672 रोजंदारी करणाऱ्या मजुरांनी देखील आत्महत्येचा पर्याय स्विकारला आहे.
“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर
41672 रोजंदारी करणाऱ्या मजुरांनी केलेल्या आत्महत्येत तमिळनाडू, महाराष्ट्र आघाडीवर आहेत. तमिळनाडूत 7673 तर महाराष्ट्रात 5270 आत्महत्या झाल्या आहेत. यातील अधिक चिंताजनक बाब म्हणजे, तमिळनाडू व महाराष्ट्रात 2017 ते 2021 या पाच वर्षाच्या काळात आत्महत्येत झपाट्याने वाढ झाली. 2017 मध्ये तमिळनाडूत 5624 तर महाराष्ट्रात 3669 आत्महत्या झाल्या आहेत.
हाच कल भाजपशासित मध्ये प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यात पाच वर्षाच चिंतेचा राहिला आहे. 2017 मध्ये मध्यप्रदेशात 3039, गुजरातेत 2131 आत्महत्या झाल्या आहेत. 2021 मध्ये मध्य प्रदेशात 4657 व गुजरातेत 3206 आत्महत्या झाल्या आहेत. दक्षिणेकडील आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातही चित्र फारसं चांगली नाही. आंध्रात 2021 मध्ये 4657 तर गुरजातमध्ये 3206 आत्महत्या झाल्या. रोजंदारी कामगारांच्या आत्महत्या देशात वर्षानुवर्षे वाढतच असल्यानं गृहमंत्रालय चिंतेत आहे.
राज्ये 2017 2021
तमिळनाडू 5624 7673
महाराष्ट्र 3669 5270
तेलंगणा 2507 4223
गुजरात 2131 3206
आंध्रप्रदेश 1397 3014