Download App

Super Blue Moon तुम्ही पाहिलात का? चंद्राच्या मोहक दृश्यांनी वेधले लक्ष

Super Blue Moon : आज आकाशात सुपर ब्लू मून (Super Blue Moon) पाहायला मिळाला. त्यात सध्या देशात आणि जगात इस्त्रोच्या चंद्रयान मोहिमेची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यात चंद्राची कोणतीही गोष्ट म्हटलं की, सर्वांच्या नजरा त्याकडे लागलेल्या असतात. त्यात आता खगोल प्रेमींनी आजच्या राखी पौर्णिमेला दिसलेल्या सुपर ब्लू मूनला पाहत चंद्राच्या मोहक दृश्यांचा आनंद घेतला.

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडट पदांसाठी भरती सुरू, हे उमेदवार करू शकतात अर्ज

चंद्राच्या मोहक दृश्यांनी वेधले लक्ष…

आकाशात सुपर ब्लू मूनचं (Super Blue Moon) दर्शन होणं ही एक आश्चर्यकारक घटना होती. त्यात देशभरातील विविध शहरांमध्ये हा आकाशात सुपर ब्लू मून पाहायला मिळाला. त्यामध्ये महाराष्ट्र बिहार उत्तरप्रदेशसह इतर भागात आकाशात सुपर ब्लू मून पाहायला मिळाला. त्यात आज शनि देखील दर्शन होणार असल्याने खगोल प्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरली आहे.

Photos : मुंडे भावंडांकडून राखी पौर्णिमा साजरी, पाहा फोटो

नॅशनल एरोनॉटीक्स अॅंड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार रात्री शनि चंद्राभोवती वर्तुळात फिरत असल्यासारखं दिसेल. तर सुपर ब्लूमूनचं दर्शन हे 31 ऑगस्टच्या सकाळपर्यंत कायम राहणार आहे. त्याच बरोबर सुपर ब्लू मून (Super Blue Moon) पाहण्याची वेळ ही उद्या गुरूवारी पहाटेनंतर सर्वोत्तम वेळ असली तरी आजचं रात्री 9.30 वाजताच चंद्र जास्तच उजळ दिसला आहे.

सुपर ब्लू मून म्हणजे काय?

आज पौर्णिमा आहे. त्यावेळी पुर्ण चंद्र, सुपर मून आणि ब्लू मून या सर्व घटना एकत्र घडत आहेत. म्हणून त्याला सुपर ब्लू मून (Super Blue Moon) असं म्हटलं गेलं आहे. कारण ही घटना क्वचित घडणारी असल्याने त्याला खगोलशास्त्रज्ञांकडून अशी नावं दिली जातात. तसेच या ऑगस्ट महिन्यात आणखी एक क्वचित घडणारी घटना घडली आहे. ती म्हणजे महिन्यात दोनदा पौर्णिमा आली. त्यात 1 ऑगस्टच्या पौर्णिमेला सूपर मून तर आज ब्लू मून म्हटलं आहे. तर आता हा ब्लू मून थेट 2026 मध्ये दिसणार आहे. 30 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 च्या सुमारास ब्लू मून अधिक उजळ दिसणार होता. याशिवाय 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास सुपर ब्लू मून अत्यंत उजळ दिसेल.

Tags

follow us