Download App

D. Y. Chandrachud : कोरोनामुळे भारतीय न्यायपालिका विकसित झाल्या

Chief Justice Of Inida :  भारताचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड ( D. Y. Chandrachud) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना कोविड-19 या महामारीमुळे भारतीय न्यायपालिकांना न्याय देण्यासाठी मॉडर्न होण्यास प्रवृत्त केले असे विधान केले आहे. यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे भारतीय न्यायपालिकांना अडचणींचा देखील सामना करावा लागला. पण आम्ही आता आपली न्यायालयीन व्यवस्था व आपल्या संस्थांना कोणतीही महामारी यायच्या आधीच विकसित करणार आहोत, असे ते म्हणाले आहेत.

देशाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी या सर्व गोष्टी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)  या बैठकीत सांगितल्या आहेत. यासाठी सर्व देशांतील सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एससीओच्या 18व्या संमेलनासाठी आले होते. यावेळी ते भारतीय न्यायव्यवस्थेकडून कोरोना काळात कशा पद्धतीने काम करण्यात आले, याची माहिती उपस्थितांना देत होते.

Satish Kaushik Death : सतिश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद?

यावेळी त्यांनी कोरोना काळात भारतीय न्यायपालिकांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंन्सद्वारे कसे काम केले हे देखील सांगितले. कोरोनाच्या काळात जिल्हा न्यायालयांनी 16 कोटी 50 लाख, उच्च न्यायालयांनी 7 कोटी 58 लाख तर सर्वोच्च न्यायालयाने 3,79,954 खटल्यांची सुनावणी ऑनलाईन पद्धतीने केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…

यावेळी त्यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. कोविड-19 या महामारीमुळे भारतीय न्यायपालिकांना न्याय देण्यासाठी मॉडर्न होण्यास प्रवृत्त केले असे विधान केले आहे. यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे भारतीय न्यायपालिकांना अडचणींचा देखील सामना करावा लागला. पण आम्ही आता आपली न्यायालयीन व्यवस्था व आपल्या संस्थांना कोणतीही महामारी यायच्या आधीच विकसित करणार आहोत, असे ते म्हणाले आहेत.

Tags

follow us