Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत फटकारले आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार वक्तव्ये करण्याची परवानगी देणार नाही. स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नका. आता जर पु्न्हा असे वक्तव्य केले तर आम्ही स्वतःच याची दखल घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे. तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नये. तुम्ही एक राजकीय नेते आहात त्यामुळे अशी बेजबाबदार वक्तव्ये करु नका अशा शब्दांत न्यायालयाने (Supreme Court) राहुल गांधींना फटकारले.
राहुल गांधी यांच्या विरोधात मॅजिस्ट्रेट न्यायालयाने याच प्रकरणात समन्स जारी केले होते. या समन्स विरोधात राहुल गांधींनी इलाहाबाद उच्च न्यायालाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, न्यायालयाने समन रद्द करण्यास नकार दिला होता. यानंतर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले होते. लखनऊ येथील वकील नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन लखनऊच्या एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड टोठावला होता. न्यायालयात वारंवार गैरहजर राहीले म्हणून न्यायालयाने हा दंड केला होता. इतकेच नाही तर कोर्टाने राहुल गांधींना थेट इशाराही दिला होता.
आम्ही सरकारसोबत, सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सरकारला बिनशर्त पाठिंबा
सुनावणीवेळी राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की कुणाला दुखावण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. यावर न्यायालयाने विचारले की तुम्ही एक राजकीय नेते आहात. मग तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य का करावे, असे करू नका. जर तुमचा उद्देश तसा नव्हता तर मग असे वक्तव्य का केले? आम्ही तुमच्याविरुद्ध प्रकरणात कारवाईला स्टे देऊ पण तुम्हाला अशी वक्तव्ये करण्यापासून नक्कीच रोखू.
आमच्याकडून आम्ही अगदी स्पष्ट आहोत. आता येथून पुढे जर अशी वक्तव्ये केली तर आम्ही स्वतः त्याची दखल घेऊ. कुणालाही देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार वक्तव्ये करण्याची परवानगी आम्ही देणार नाही. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर असा व्यवहार करता. तुम्ही (राहुल गांधी) सावरकरांवर केलेले वक्तव्य बेजबाबदार होते अशा शब्दांत न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले.
सन 2022 मध्ये महाराष्ट्रातील अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. इंग्रजांचे नोकर आणि पेन्शन घेणारे सावरकर होते असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली होती. परंतु, त्यांनी वक्तव्यावरून माघार घेतली नव्हती.
Video : राहुल गांधींच्या जखमेवर फडणवीसांचा वर्मी घाव, म्हणाले, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय