सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : 2000 रुपयांच्या नोटा बदलताना ओळखपत्र किती आवश्यक?

RBI withdrawn Rs 2000 notes : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने 2000 रुपयांच्या नोटा रिक्विजिशन स्लिप आणि आयडी प्रूफशिवाय बदलून देण्याविरुद्धची याचिका फेटाळली. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, ही आरबीआयची धोरणात्मक बाब असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. अश्विनी उपाध्याय […]

2000 Note Ban

2000 Note Ban

RBI withdrawn Rs 2000 notes : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने 2000 रुपयांच्या नोटा रिक्विजिशन स्लिप आणि आयडी प्रूफशिवाय बदलून देण्याविरुद्धची याचिका फेटाळली. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, ही आरबीआयची धोरणात्मक बाब असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. खरे तर अश्विनी उपाध्याय यांनी याच मुद्द्यावर यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. कोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेणे बेकायदेशीर असल्याचे जनहित याचिकामध्ये म्हटले आहे.

उपाध्याय यांनी दावा केला आहे की 2000 रुपयांच्या मोठ्या नोटा एकतर खाजगी तिजोरीत पोहोचल्या आहेत किंवा फुटीरतावादी, दहशतवादी, माओवादी, ड्रग तस्कर आणि भ्रष्ट लोकांकडे आहेत. अशा परिस्थितीत ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची अधिसूचना पूर्णपणे तर्कहीन आणि घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन करणारी आहे.

Threads; ‘थ्रेड्स’वरुन मस्क-झुकरबर्गमध्ये जंगी युद्ध, एका ट्विटने दोघांत जुंपली

मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही आणि रिट फेटाळून लावली. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टानेही ही आरबीआयची धोरणात्मक बाब असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली.

रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी आरबीआयने नोटा काढण्याची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत निश्चित केली होती. 2000 रुपयांच्या नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात आल्या होत्या. पण पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर आरबीआयने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या.

Photos …तर क्रिकेटर नाही, मच्छीमार झाले असते सुनील गावस्कर; पाहा फोटो

पण नंतर 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती. 2016-17 ते 2021-22 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अहवालानुसार, 2016 पासून 500 आणि 2000 च्या एकूण 6849 कोटी चलनी नोटा छापल्या होत्या. त्यापैकी 1,680 कोटींहून अधिक चलनी नोटा चलनातून गायब आहेत. या गहाळ नोटांची किंमत 9.21 लाख कोटी रुपये आहे. या गहाळ नोटांमध्ये नष्ट झालेल्या खराब नोटांचा समावेश नाही.

Exit mobile version