Download App

Supreme Court चा निर्णय म्हणजे अखंड भारत…; कलम 370 वैध ठरल्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निकाल दिला आहे. तर न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज 11 डिसेंबरला कलम 370 रद्द करणे या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ घटनात्मकच नाही तर तो एक आशेचा किरण आहे. उज्जल भविष्यासाठी एक अखंड भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी केलेल्या सामुहिक संकल्पाचा दाखला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

आज 11 डिसेंबरला कलम 370 रद्द करणे या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निकाल दिला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. त्यामध्ये ते म्हणाले की, आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही ऐतिहासिक आहे. हा निर्णय वैध ठरवल्याने 5 ऑगस्ट 2019 रोजी सरकरने घेतलेला कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा घटनात्मकदृष्ट्या योग्य ठरला आहे.

 ‘अ‍ॅनिमल’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे जम्मू कश्मीर आणि लडाखच्या बंधु-भगीनींसाठी आशा, समृद्धी आणि एकतेची घोषणा आहे. एक भारतीय म्हणून आपण ज्या एकतेने देशावर प्रेम करतो. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रगल्भतेते शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मी जम्मू कश्मीर आणि लडाखच्या बंधु-भगीनींना अशावासन देऊ इच्छितो की, आम्ही तुमची स्वप्न पुर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. या विकासाचा लाभ केवळ तेथील नागरिकांनाच नाही तर कलम 370 मुळे त्रास सहन केलेल्या सर्वांना होणार आहे.

सिद्धरामय्यांची अवस्था ठाकरेंसारखी होणार! कर्नाटकात लवकरच 60 आमदारांसह ऑपरेशन लोटस

तसेच मोदी पुढे म्हणाले की, आज 11 डिसेंबरला कलम 370 रद्द करणे या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ घटनात्मकच नाही तर तो एक आशेचा किरण आहे. उज्जल भविष्यासाठी एक अखंड भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी केलेल्या सामुहिक संकल्पाचा दाखला आहे.

लोकसभेसोबत वाजणार जम्मू-कश्मीर निवडणुकांचे बिगुल? सुप्रीम कोर्टाचे दोन मोठे निर्देश

दरम्यान जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने या प्रकरणावर कलम 370 (Article 370) हटवणे योग्यच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात 16 दिवसांच्या सुनावणीनंतर 5 सप्टेंबर रोजी युक्तिवाद पूर्ण झाला त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

follow us

वेब स्टोरीज