Download App

…तर महात्मा गांधींनाही इंग्रजांचे नोकर म्हणणार का? सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींना सु्प्रीम कोर्टाने फटकारले

Rahul Gandhi यांना स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकरले आहे.

Suprime Court slaps Rahul Gandhi on Savarkar Defamation case : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकरले आहे. तसेच कोर्टाने राहुल यांना जारी करण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या अलाहाबाद हायकोर्टच्या आदेशांना स्थगिती दिली आहे. तसेच कोर्टाने सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींना महात्मा गांधींनाही इंग्रजांचे नोकर म्हणणार का? असा सवाल करत फटकारले आहे.

कोर्टाने काय म्हटले?

2022 मध्ये भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, सावरकर हे इंग्रजांचे नोकर होते. त्यावरून त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल आहे. त्यावर पुन्हा एकदा न्यायमुर्ती दिपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. त्यांनी गांधींना याबाबत फटकारले आहे.

सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, पण…; पहलगाम हल्ल्याबाबत पवार काय म्हणाले?

ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले त्यांच्याबाबत तुम्ही असं वक्तव्य करता? महाराष्ट्रात सावरकरांची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही हे असेच वक्तव्य करत राहाल तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. स्वातंत्र्य सैनिकांबाबत असे कोणतेही वक्तव्य खपून घेतले जाणार नाही. जर इंग्रजांना पत्र व्यवहार करण्यावरून सावरकरांना तुम्ही इंग्रजांचे नोकर म्हणता तर महात्मा गांधी देखील व्हाईसरॉयला पत्र लिहित होते. त्यांना देखील इंग्रजांचे नोकर म्हणणार का? तसेच तुमच्या आजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना सावरकरांचे कौतुक करणारे पत्र दिले होते.

राहुल गांधींना हवे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘हिंदुत्व पुस्तक’, न्यायालयात अर्ज…

दरम्यान दुसरीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अपमान प्रकरणी कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायने हा खटला तहकूब केल्याचं समोर आलंय. पुणे येथील प्रथमवर्ग एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींविरोधात (Swatantryavir Savarkar Case) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची मानहाणी केली म्हणून बदनामीचा खटला चालू आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींना रिटर्न टिकीट! पुण्यात किती पाकिस्तानी? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला आकडा

फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी खटला दाखल करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहलेले ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक तसेच एक पेन ड्राईव्ह आणि काही वर्तमानपत्रांची कात्रणं न्यायालयात दाखल केलेली आहेत. त्या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला मिळालेल्या नाहीत. ते सर्व कागदपत्रं आणि माझी जन्मठेप हे पुस्तक बचाव पक्षाला देण्याचे आदेश न्यायालयाने करावेत, असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलींद दत्तात्रय पवार यांनी मागील सुनावणीत दाखल केला होता.

Pahalgam Terror Attack : कसं मोदी सरकार म्हणेल तसं… शरद पवारांनी दिलं समर्थन

त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्र, पेन ड्राईव्ह आणि ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक बचाव पक्षाला म्हणजेच राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड मिलिंद दत्तात्रय पवार यांना द्यावेत असा आदेश न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला होता. आज झालेल्या सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोलाटकर यांनी वरिल सर्व कागदपत्र, माझी जन्मठेप हे पुस्तक पुणे न्यायालयात अ‍ॅड मिलिंद द.पवार यांना हस्तांतरित केले.

follow us