अभिनय सोडून राजकारणात आलेला मोदींचा सहकारी मंत्री वैतागला; म्हणाला, माझं उत्पन्न बंद झालं

मला अभिनयाची आठवण येते. राजकीय जबाबदाऱ्या पेलत असताना मला माझ्या आवडीचं कामही करायचं आहे.

अभिनय सोडून राजकारणात आलेला मोदींच्या सहकारी मंत्री वैतागला; म्हणाले, माझं उत्पन्न बंद झालं

अभिनय सोडून राजकारणात आलेला मोदींच्या सहकारी मंत्री वैतागला; म्हणाले, माझं उत्पन्न बंद झालं

Suresh Gopi Offers To Resign Cites Drop In Income Wants To Resume Film Acting : अभिनय क्षेत्र सोडून राजकारणात आलेल्या आणि मोदींच्या मंत्रिमंडळात (Narendra Modi Cabinet) असलेल्या एका मंत्र्याने थेट कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. राजकारणा आल्यापासून माझ्या कामाईत लक्षणीय घट झाली असल्याचेही या मंत्र्यानं म्हटले आहे. मला कार्यमुक्त करून माझ्या जागी सी. सदानंद मास्टर यांना मंत्री बनवण्याची शिफारसही मोदींच्या सहकाऱ्याने केली आहे. कार्यमुक्त होण्याची मागणी करणारी व्यक्ती सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पर्यटन राज्यमंत्री आहेत. 66 वर्षीय माजी राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि विद्यामान केंद्रीय मंत्री कन्नूरमधील भाजपच्या एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दक्षिणेत खाते उघडल्याने भाजपकडून थेट केंद्रीय मंत्रिपद, पण खासदाराने इंदिरा गांधींचे गोडवे गायले !

माझी कमाई थांबलीय, मला पैशांची गरज

कार्यमुक्त करण्याची मागणी करणारी व्यक्ती सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पर्यटन राज्यमंत्री असून, सुरेश गोपी (Suresh Gopi) असे त्यांचे नाव आहे. मंत्री झाल्यामुळे उत्पन्न घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मला अभिनयाची आठवण येते. राजकीय जबाबदाऱ्या पेलत असताना मला माझ्या आवडीचं कामही करायचं आहे.

मला कधीच चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सोडून मंत्री व्हायचं नव्हतं. मला मंत्री व्हायचं नाही, हे मी निवडणुकीच्या एक दिवस आधीच पत्रकारांना सांगितलं होतं. मला चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु ठेवायची आहे. मला खरंच अभिनय करायचा आहे. मला आणखी पैसे कमावण्याची गरज आहे. आता माझं उत्पन्न पूर्णपणे बंद झालंय,’ असं सुरेश गोपी यांनी पुढे म्हटलं.  सुरेश गोपी हे केरळमधील भाजपचे पहिले लोकसभा खासदार आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळातले अनोळखी चेहरे; सर्वात श्रीमंत, प्रामाणिक खासदार बनले मंत्री

अभिनयाचा मोठा पल्ला

सुरेश गोपी मल्याळम व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम करतात. ते एक पार्श्वगायक देखील आहेत. त्यांची चित्रपट कारकीर्द दीर्घ आहे, परंतु त्यांनी 2016 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1965 मध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि 1986 मध्ये त्यांनी पहिल्यांना चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली.

Exit mobile version