Download App

दिल्लीतील राजकारण तापले, राहुल गांधींनी अचानक रद्द केला परदेश दौरा

Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर निलंबनावरुन दिल्लीतील राजकारण तापले आहे. मोईत्रा यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अशात काँग्रेस नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) विदेश दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2023) निकालानंतर राहुल गांधी यांचा नियोजित परदेश दौरा होता. मात्र तीन राज्यातील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर त्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका सुरू झाली होती.

राहुल गांधी ‘या’ देशांना भेट देणार होते
राहुल गांधी 8 डिसेंबरपासून दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर जाणार होते. ते 8 डिसेंबरला संध्याकाळी मलेशियाला पोहोचणार होते आणि 10 डिसेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम होता. यानंतर ते 11-12 डिसेंबरला सिंगापूरला जाणार होते. सिंगापूरनंतर राहुल गांधी 13 डिसेंबरला जकार्ताला पोहोचणार होते. त्याचवेळी 14 डिसेंबरला राहुल गांधी हनोईला जाणार होते. यानंतर ते 15 डिसेंबरच्या रात्री हनोईहून दिल्लीला रवाना होणार होते.

रिपोर्टनुसार, राहुल गांधी या देशांतील काही विद्यापीठांमध्ये भारतीय प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

विरोधकांच्या सभात्यागाचा सरकारने घेतला फायदा; कसिनो नियंत्रण विधेयक केलं मंजूर

तीन राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला
तेलंगणा वगळता सर्व राज्यांमध्ये काँग्रेससाठी वाईट परिणाम दिसून आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने पूर्ण बहुमत मिळवले आहे आणि मिझोराममध्येही दोन जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती.

ऐन थंडीत राजकारण तापलं! ‘महुआवर अन्याय अन् लोकशाहीची हत्याच’; ममता बॅनर्जी भडकल्या

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी 9 डिसेंबरपासून इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि व्हिएतनामच्या दौऱ्यावर जाणार होते.पण संसदेचे हिवाळी अधिवेशनही सुरू आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत इंडिया आघाडीची बैठकही आयोजित केली जाणार आहे. काही काँग्रेस नेते आणि ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे हा दौरा रद्द केल्याचे बोलले जाते.

Tags

follow us