Download App

चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा तर, शिवशक्ती पॉइंटला राजधानी; चक्रपाणी महाराजांची मोदींकडे मागणी

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : भारताचं चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचत नवा इतिहास रचला आहे. भारताच्या या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान 3 चं लँडिंग झालेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट असे नाव दिलं जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र, त्यानंतर आता चंद्राला हिंदु राष्ट्र तर, शिवशक्ती पॉइंटला त्याची राजधानी घोषणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी ही मागणी सरकारकडे केली आहे. जिहादी मानसिकतेचे लोक चंद्रावर पोहोचण्यापूर्वीच चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करावे आणि शिवशक्ती पॉइंट हिंदू राष्ट्राची राजधानी बनवायला हवे. अशी मागणी चक्रपाणी महाराजांनी केली आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान किती? विक्रम लँडरने दिलं उत्तर

गझवा-ए-हिंद बनवू नका…

चांद्रयान-3 च्या लँडिंग स्थळाचे नाव शिवशक्ती पॉइंट असे ठेवल्याबद्दल च्रकपाणी महाराजांनी मोदींचे आभार मानले. तसेच कोणत्याही विचारसरणीच्या लोकांनी किंवा इतर देशातील लोकांनी तेथे जाऊन गजवा-ए-हिंद बनवू नये, यासाठी संसदेने ठराव मंजूर करून चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करवे असे मला वाटते. तसेच शिवशक्ती पॉइंटला राजाधानी म्हणून घोषित करावे.

Sanjay Raut : एक राऊत सब पे भारी; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना एकाचवेळी भिडले

शिवशक्ती राजधानी का?

चंद्राला हिंदु राष्ट्र म्हणून घोषण्याची मागणी करताना चक्रपाणी महाराजांनी या राष्ट्राची शिवशक्ती पॉइंट राजधानी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे. तसेच हिंदूंचे चंद्राशी जुने नाते असून, अनेक धर्मग्रंथांमध्ये चंद्राचे अनेक संदर्भ आहेत. चंद्राची शुद्धता आणि पावित्र्य राखले जावे असे मला वाटते. त्यामुळेच सरकारने लवकरात लवकर प्रस्ताव आणून चंद्राला हिंदु सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी च्रकपाणी महाराजांनी केली आहे.

Tags

follow us