चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान किती? विक्रम लँडरने दिलं उत्तर

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान किती? विक्रम लँडरने दिलं उत्तर

Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान 3 (Chandrayaan 3) यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं. त्यानंतर आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली असून एक मोठा शोध लावला आहे. विक्रम लँडरवरील ChaSTE पेलोडने सुरुवातीची माहिती पाठवली आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने (ISRO) ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. विक्रम लँडरवरील ChaSTE पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान मोजले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केलेली ही पहिलीच तपासणी आहे. तपासणी करणारा भारत हा पहिलाच देश आहे. या माहितीच्या आधारे विस्तृत विश्लेषण करण्याचे काम सध्या सुरू आहे.

चंद्रावर भारताचं ‘शिवशक्ती’ अन् ‘तिरंगा केंद्र’; Chandrayaan 3 उतरलेल्या जागेला मोदींनी दिलं नाव

याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी इस्त्रोने एक ग्राफ शेअर केला आहे. यानुसार चंद्रावरील पृष्ठभागाचे तापमान 50 अंश सेल्सिअस इतके आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून एक सेंटीमीटर उंचीवर 56 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. अधिक खोलवर गेले तर तापमानात वेगाने घट होते. 80 मिलीमीटर आत गेले तर तापमान मायनस 10 अंशांपर्यंत घटते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर चंद्राचा पृष्ठभाग उष्णतेला टिकवून ठेऊ शकत नाही.

इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचे जे फोटो घेतले आहेत त्यांना इस्त्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार आहे. अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांच्या ग्राउंड स्टेशन्सकडेही सहकार्य मागितले जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर कोणतेही वातावरण नाही. त्यामुळे फोटो सुद्धा अस्पष्ट येतील. स्पष्ट फोटो मिळवणे कठीण होत आहे.

भारत हा जगातील पहिलाच देश आहे जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला आहे. या ठिकाणी दऱ्या पर्वत आहेत ज्यामुळे येथील परिस्थिती अत्यंत कठीण बनली आहे. मोजमाप करण्यात थोडी जरी चूक राहिली तर मोहिम अयशस्वी होण्याचाही धोका असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यापूर्वी कोणीही पोहोचले नव्हते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरला.

Chandrayan 3 : विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर, ISRO कडून व्हिडिओ ट्वीट

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube