Download App

Firecracker Blast : तामिळनाडूत फटाका कारखान्यांत भीषण स्फोट; 14 जणांचा मृत्यू

Firecracker Blast : तामिळनाडू राज्यातून (Tamil Nadu) मोठी बातमी समोर आली आहे. येथील विरुधुनगर जिल्ह्यातील (Firecracker Blast) शिवकाशी भागात दोन फटाक्यांच्या कारखान्यांत मोठा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत 14 लोकांचा मृत्यू झाला. पहिला स्फोट श्रीविल्लीपुथूर जवळील रेंगापलायम गावात मंगळवारी दुपारी अडीच वाजता झाला. या घटनेतच 13 कामगारांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनाइकेनपट्टी गावात झाला. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना तीन लाख तर जखमी झालेल्यांना एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.  या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Same Sex Marriage : मोठी बातमी : SC ने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाकारली

रंगपालयमच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथकाने स्थानिक लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. येथे ढिगाऱ्यातून सात जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात तिघे जण भाजले आहेत. नंतर तिघांचाही मृत्यू झाल्याचे कळले.

दुसरा अपघात किचेनायकेपट्टी गावात झाला. जिथे रसायन मिसळताना एका कामगाराचा मृत्यू झाला. हे देखील एक परवानाकृत युनिट होते. दोन्ही कारखाने जवळ नव्हते. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मृतांचे कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. तसेच जिल्ह्याचे महसूल अधिकारी या दोन्ही अपघातांची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणार आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलीस तपासानंतर स्फोट नेमका कशामुळे झाला याचे उत्तर मिळेल.

India Partition : ‘देशाची फाळणी ही ऐतिहासिक चूक’; ओवैसींनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, देशात सण उत्सवांचा काळ सुरू आहे. दिवाळीचा सण तर अगदी महिन्यावर येऊन ठेपला आहे. दिवाळीत फटाक्यांना मोठी मागणी असते आणि तामिळनाडूतूनच देशभरात फटाक्यांचा पुरवठा केला जातो. येथे फटाके तयार करण्याचे मोठे कारखाने आहेत. शिवकाशी परिसर यासाठी प्रसिद्ध आहे.

Tags

follow us