Udhayanidhi Stalin : मी जे काही बोललो ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा बोलेन, असं म्हणत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दाखवून दिलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत मोठ विधान केलं होतं. त्यावरुन देशभरातील भाजप नेत्यांकडून त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून टीका होत असतानाही पुन्हा एकदा स्टॅलिन यांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलंय.
Sajan Pachpute : ठाकरे गटात येताच साजन पाचपुतेंना मोठं पद, काका-पुतण्याचा संघर्ष पेटणार!
स्टॅलिन म्हणाले, “मी जे काही बोललो ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा बोलेन. मी फक्त हिंदू धर्माचाच नाही तर सर्व धर्मांचा उल्लेख केला होता. मी धर्मातील जातीव्यवस्थेचा निषेध करताना ते बोललो होतो, आणखी काही नाही” असं उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं आहे.
अॅड. हरीश साळवे 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर; त्रिनाशी लंडनमध्ये विवाहबद्ध
पुढे बोलताना ते म्हणाले, “सनातन धर्माला विरोध नाही तर पूर्णपणे त्याचे निर्मुलन करायला हवे. जसे आपण कोरोना, डेंगु, मलेरियाला नष्ट करतो, तसेच आपण सनातन धर्माला नष्ट केले पाहिजे.’ उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून या मुद्द्यावरुन इंडिया आघाडी आणि काँग्रेसला टार्गेट करण्यात आलं आहे.
गोवारी घटनेनंतर पवारांनी राजीनामा दिला नव्हता; आता त्यांना काय अधिकार ? बावनकुळेंचा सवाल
काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन :
सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.
मुंबईतून आदेश आल्यानंतरच बळाचा वापर; पवारांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
मंत्री अमित शाह म्हणाले :
हिंदूत्वाचा द्वेष यातून प्रकट होत आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीची हीच भूमिका आहे. त्यांना देशाची संस्कृती नष्ट करायची आहे.
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानानंतर दिल्लीत सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी होणार असल्याचं बोललं जात आहे, त्यावर आता ठाकरे काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.