स्टालिन यांचे नितीशकुमारांच्या पावलावर पाऊल; तामिळनाडूमधील महिलांच्या खात्यावर पाच हजार रुपये

M K Stalin:

M K Stalin

M K Stalin

TamilNadu Election 2026: महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक राज्यात थेट महिलांच्या खात्यावर पैसे दिले जाणार आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन (M K Stalin) यांनी महिलांना पाच हजार रुपये देण्याची घोषणा केलीय. ही एकरकमी पैसे आहेत. त्यानंतर 1 कोटी 31 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले आहेत. या राज्यात एप्रिल-मे महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. तामिळनाडूमध्येही (TamilNadu) महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये दिले जातात.


ज्योतिषाने केलं ‘ब्रेन वॉश’ आणि मुलीने ओलांडली क्रूरतेची सीमा, वाचा काय घडलं?

सरकारने 1 कोटी 31 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये वर्ग केले जात आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील आगाऊ रक्कम म्हणून तीन हजार रुपये दिले आहेत. तर उन्हाळ्यात स्पेशल पॅकेज म्हणून दोन हजार रुपये असे एकत्रित पाच हजार रुपये सरकार देत असल्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी जाहीर केलीय. ही मदत लगेच खात्यात वर्ग केली जात आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे ही मदत रोखली जाऊ नये म्हणून आधीच दिली जात असल्याचे स्टालिन यांनी स्पष्ट केलंय. काही लोकांकडून ही रक्कम देण्यापेक्षा रोखले जाऊ शकते. त्यामुळे ती मदत आधी दिल्याचा आरोपही स्टालिन यांनी केलाय.

T20 World Cup मध्ये मोठा उलटफेर; झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरविले


तर महिन्याला दोन हजार रुपये देणार…

मी माझ्या बहिणींना वचन देतो की, मी पुन्हा निवडून आल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये एेवजी 2000 रुपये रक्कम दिली जाईल, अशी घोषणा स्टालिन यांनी केली आहे.


बिहाराच्या पावलावर स्टालिन यांचे पाऊल

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची सुरुवात केलीय. या योजनेत 75 लाख महिलांच्या खात्यावर एकावेळी दहा हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर येथे जेडीयू आणि भाजपचे सरकार पुन्हा आले. नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात.

Exit mobile version