TamilNadu : तामिळनाडूमध्येही राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पेटणार, राज्यपालांची सरकारवर टीका

  • Written By: Published:
TamilNadu  : तामिळनाडूमध्येही राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पेटणार, राज्यपालांची सरकारवर टीका

तामिळनाडूचे राज्यपाल (Tamil Nadu Governor) आरएन रवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आरएन रवी (RN Ravi) (Tamil Nadu Governor) यांनी पुन्हा एकदा द्रमुक सरकारवर निशाणा साधला आहे. दलितांवरील हल्ल्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांनी डीएमके सरकारला जबाबदार धरले आणि सांगितले की कायद्याची अंमलबजावणी आणि फौजदारी न्याय यंत्रणा दलितांवरील गुन्हे रोखण्यात अपयशी ठरली आहे. अशी टीका त्यांनी केली आहे

  पाकिस्तानची नाचक्की! आयएमएफची टीम कर्ज न देताच निघून गेली

आज अण्णा विद्यापीठात ‘मोदी @ 20’ आणि ‘आंबेडकर आणि मोदी’ या पुस्तकाच्या तामिळ आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “आमच्या राज्यात सामाजिक न्यायाबद्दल खूप बोललं जातं पण प्रत्येक दिवशी दलितांवर होणारे अत्याचार ऐकायला मिळतात.” पण याचवेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, “आपण सर्वांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे प्रत्येकजण आंबेडकरांचा विचार करू लागला आहे.”

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “यापूर्वी लोक बाबासाहेब आंबेडकरांचे नाव राजकारणासाठी वापरत. एखाद्यावर आरोप करण्यासाठी किंवा स्वतःची स्तुती करण्यासाठी लोक त्याच्या नावाने शपथ घेत असत.”

बाबासाहेब आंबेडकर हे महान राष्ट्रवादी असल्याचे सांगत रवी म्हणाले की, “ब्रिटिशांनी देशाचे विभाजन करण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंबेडकर खडकासारखे उभे राहिले.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube