Congress won’t See Tax Action Till Polls Centre Tells Supreme Court : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, निवडणुका होईपर्यंत थकबाकी कर वसुलीबाबत काँग्रेसवर (Congress) कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती केंद्र सरकराने आज (दि.1) सुप्रीम कोर्टात दिली आहे. यामुळे आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणी काँग्रेसला काही दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे. कर वसुलीच्या नोटीसीविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आङे. त्यावरील सुनावणीदरम्यान केंद्राने न्यायालयात वरील माहिती दिली आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आयकर विभागाच्या (Income Tax) वतीने युक्तिवाद केला. आयकर विभागाकडून काँग्रेस पक्षाला 3,567 कोटी कर भरण्यास सांगितले आहे. काँग्रेसला दिलेल्या नोटीसविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे.
Centre tells Supreme Court it will not take action against Congress over ₹3,500 crore tax demand until end of elections
report by @DebayonRoy #IncomeTax #CongressParty #SupremeCourtOfIndia @INCIndia @IncomeTaxIndiahttps://t.co/aYK5mhyo92
— Bar and Bench (@barandbench) April 1, 2024
तुषार मेहता यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, निवडणूक लढवताना कोणत्याही पक्षाला अडचणी येऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे कर वसुली करण्यासाठी सध्या कोणतेही कठोर पाऊलं उचलले जाणार नाही.