Thackeray Wildlife Foundation : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे कायम जंगलांमध्ये भ्रमंती करत असतात. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांचं संशोधन सुरु असतं. (Wildlife Foundation ) यापूर्वी त्यांनी सरड्यांच्या काही नवीन जाती शोधून काढल्या होत्या. आताही त्यांनी अशी नवीन जात शोधण्यात यश आलं आहे.
आता तेजस ठाकरे यांनी आणखीन एक शोध लावला आहे. ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशनचा हा नवा शोध असल्याचं म्हटलं जातंय. फाऊंडेशनने अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीच्या खोऱ्यातून नवीन लहान आकाराच्या ड्रॅगन सरड्याचा शोध लावला आहे. यामध्ये दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये नियमित आढळणाऱ्या अगामिड सरड्यांच्या गटातील कॅलोट्स या प्रजातीशी संबंधित हा सरडा आहे. या प्रजातीचे नाव “सिनिक” या नदीमुळे असलेल्या टॅगिन शब्दावरून ठेवण्यात आलं आहे. हा शोध ईशान्य भारतातील समृद्ध जैवविविधतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
तेजस ठाकरे यांचे बॅनर! उद्धव यांचा दुसरा मुलगा राजकारणात उतरण्याची तयारीत?
अनेक प्रजातीचा शोध
तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने दुर्मिळ पाली, सरडे, साप आणि माशांचाही शोध लावला आहे. मध्यंतरी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. त्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली होती. त्यांनी सापाची नवीन प्रजाती शोधली. तिला सह्याद्रीओफिस उत्तरघाटी असे नाव दिले होते. जगापासून अलिप्त असलेल्या सह्याद्रीच्या भागात जाऊन त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी खेकडे, मासे, पाली अशा अनेक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला.
फोर्ब्स मासिकाकडून दखल
मार्च महिन्यात आदित्य ठाकरे आणि त्यांचे दोन सहकारी यांनी तामिळनाडूच्या जंगलात भगोल बुबळे असलेल्या दोन पालीच्या प्रजातींचा शोध लावला आहे. या दोन पाली वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या आहेत. तामिळनाडूतील पश्चिम घाटात पूर्व उतारातील जंगलामध्ये तेजस ठाकरे यांनी गोल-बुळुळ्याच्या दोन पालींच्या प्रजातीचा शोध लावला आहे. याची दखल फोर्ब्स मासिकाने घेतली आहे.