‘एक नातू अदानींचा ड्रायव्हर तर दुसरा अंबानींकडे नाचतो’; नितेश राणेंची सडकून टीका

‘एक नातू अदानींचा ड्रायव्हर तर दुसरा अंबानींकडे नाचतो’; नितेश राणेंची सडकून टीका

Nitesh Rane : एक नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो तर दुसरा नातू अंबानींकडे नाचतो, अशी सडकून टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर केलीयं. दरम्यान, अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमात तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी डान्स केल्याचं समोर आलं. ठाकरे यांनी केलेल्या डान्सवरुन नितेश राणे यांनी सडकून टीका केलीयं. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्या चारचाकीचं स्टेअरिंग हाती घेत गाडी चालवल्याचंही दिसून आलं होतं. त्यावरुन आता नितेश राणे यांनी ठाकरे-पवारांना घेरलंय.

वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन; बडा नेता हाताशी येताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घेरले

नितेश राणे म्हणाले, एक नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो तर दुसरा अंबानींकडे नाचतो, तुम्ही कुठल्या तोंडाने अदानींना शिव्या घालत आहात. एकीकडे आपल्या नातवंडांनी ड्रायव्हर आणि कार्यक्रमात नाचायचं तर दुसरीकडे महाराष्ट्रासमोर येऊन गुजराथींना शिव्या घालायच्या. यापेक्षा आपल्या नातवंडांनी नाच्या अन् ड्रायव्हर होणं बंद केलं पाहिजे ना…तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही गुजराथी समाजाला आणि अंबानींना शिव्या घालता आहात,
आता तेजस ठाकरेला नवीन नाव नाच्या पाडलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

वडेट्टीवारांची काम थांबवण्याची मागणी; महाजनांकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, सभागृहात जोरदार घमासान

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आहे. या विवाह सोहळ्याला अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांनी हजेरी लावलीयं. या सोहळ्यातील एका व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी स्टेजवर डान्स केला. सेलिब्रिटींसोबतच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरेसुद्धा स्टेजवर नाचताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर बोलताना नितेश राणे यांनी टीका केलीयं.

तर शरद पवार आणि उद्याेजक गौतम अदानींच्या उपस्थितीत बारामतीत विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानींच्या वाहनाचं स्टेअरिंग हाती घेतल्याने विरोधकांकडून सडकून टीका केली जात होती. आता नितेश राणे यांनीही याच घटनेचा दाखला देत शरद पवारांसह रोहित पवार यांच्यावर टीका केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube