Download App

Tejashwi Yadav चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात; तेजस्वी यांना अटकेची भीती

  • Written By: Last Updated:

बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav )आज सीबीआय (CBI) कार्यालयात हजर राहणार आहेत. ते काही वेळापूर्वी आपल्या घरातून सीबीआय कार्यालयासाठी निघाले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना शनिवारी सीबीआयसमोर हजर राहण्याचा आदेश दिला होता. तेजस्वी यादव यांनी सीबीआय विरोधात याचिका दाखल केली होती.

राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा

 

कोर्टाचा दिलासा नाही

सीबीआयने याआधी तेजस्वी यादव यांना तीन वेळा चौकशीसाठी समन्स पाठविले होते. तेजस्वी यादव यांच्या वकिलांनी १५ मार्चच्या दिवशी सीबीआयच्या समन्सविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. १६ मार्च रोजी याची सुनावणी झाली आणि कोर्टाने २५ मार्च रोजी सीबीआय समोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार तेजस्वी आज सीबीआय कार्यालयात जात आहेत.

‘जागेच्या बदल्यात नोकरी’ प्रकरणात सीबीआयने तेजस्वी यादव यांचे वडील आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्यासह १६ लोकांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात सीबीआयकडून तेजस्वी यादव यांचीही चौकशी केली जात आहे.

Rahul Gandhi : अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून हे प्लॅनिंग, राहुल गांधींवरील कारवाईवर प्रियंका भडकल्या

अटकेची भीती

कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये तेजस्वी यादव यांच्या वकिलाने न्यायालयात मुद्दा मांडला होता की तेजस्वी यादव सीबीआय कार्यालयात गेले तर त्यांनी त्याला चौकशीच्या नावाखाली बोलावून त्याला अटक केली जाऊ शकते. त्यावर सीबीआयकडून बाजू मांडताना सीबीआयने आश्वासन दिले की या महिन्यात तेजस्वी यांच्या अटकेच काहीच निमित्त नाही. फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करणे शक्य नाही कारण काही कागदपत्रे तेजस्वी यादव यांच्यासमोर ठेवली जातील ज्यावर त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

Tags

follow us