Download App

अनुसुचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं तेलंगाणा हे देशातील पहिल राज्य; वाचा, सविस्तर

अधिसूचनेनुसार, अनुसुचित जाती अधिनियम २०२५ ला ८ एप्रिल रोजी राज्यपालांनी मंजुरी दिली. त्यानुसार, राजपत्रात म्हटलं की,

  • Written By: Last Updated:

SC Sub Categorization Telangana State : अनुसुचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं तेलंगाणा हे देशातील पहिल राज्य ठरलं आहे. तेलंगाणातील काँग्रेस सरकारनं सोमवारी याचं नोटिफिकेशन काढलं. (Telangana) ज्यामध्ये औपचारिकरित्या राज्यात SC उपवर्गीकरण लागू करण्यात आलं. मुख्यमत्री रेवंथ रेड्डी यांनी हे ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.

तेलंगाणा राज्यानं काढलेल्या नोटिफिकेशननुसार, यामध्ये I, II, III असे तीन ग्रुप करण्यात आले आहेत. त्यात अनुसुचित जातींसाठी असलेल्या १५ टक्के कोट्यापैकी १ टक्का आरक्षण I ग्रुपला मिळेल. त्यानंतर II ग्रुपला ९ टक्के आरक्षण तर III या ग्रुपला ५ टक्के आरक्षण लागू असेल. यामध्ये I ग्रुपमध्ये १५ अनुसुचित जातींचा समावेश करण्यात आला आहे. II ग्रुपमध्ये १८ अनुसुचित जातींचा तर III या ग्रुपमध्ये २६ अनुसुचित जातींचा समावेश असेल.

Prakash Ambedkar : UPSC परिक्षेतून आरक्षण हटवलं! आंबेडकरांनी तेलंगणा सरकारला फैलावर घेतलं

अधिसूचनेनुसार, अनुसुचित जाती अधिनियम २०२५ ला ८ एप्रिल रोजी राज्यपालांनी मंजुरी दिली. त्यानुसार, राजपत्रात म्हटलं की, संबंधित मंजुरीला सामान्य माहितीसाठी १४ एप्रिल २०२५ रोजी तेलंगाणाच्या राजपत्रात प्रकाशित केलं जात आहे. या क्षणापासून तेलंगाणात रोजगार आणि शिक्षणात एसी उपवर्गीकरण लागू होईल. याचं राजपत्र आणि सरकारी आदेश आम्ही काढला आहे. राजपत्राची पहिली प्रत मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना देण्यात आली आहे. यामध्ये एससी उपवर्गीकरण कॅबिनेट उपसमितीचे प्रभारी असलेले तेलंगाणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी म्हटलं की, जर २०२६ मध्ये जणगणना झाली तर अनुसुचित जातींची लोकसंख्या वाढू शकते, त्यानंतर या वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात संबंधित जातींच्या आरक्षणात बदल केले जातील.

तसंच मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ट्विटरवर म्हटलं की, तेलंगाणा भारतातील पहिलं राज्य बनलं आहे जिथं एसी उपवर्गीकरणाचा क्रांतिकारी निर्णय लागू करण्यात आला आहे. आम्हाला इतिहास रचल्याचा गर्व आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभ दिनी तेलंगाणा राज्य सरकारनं सामाजिक न्यायाच्या एका महान कार्याला लागू करत त्यांना सर्वात चांगल्या प्रकारे अभिवादन केलं आहे. ज्यामध्ये एससी उपवर्गीकरणाची मोठ्या कालावधीपासून होत असलेली अंमलबजावणीचा समावेश आहे. तेलंगाणातील मडिगा समुदाय गेल्या ३० वर्षांपासून या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत होते.

यामध्ये १५ टक्क्यांत उपवर्गीकरणात I,II,III हे तीन ग्रुप.

१ टक्का आरक्षण I ग्रुपला मिळणार.

९ टक्के आरक्षण II ग्रुपला मिळणार.

५ टक्के आरक्षण IIIया ग्रुपला मिळणार.

 

I ग्रुपमध्ये १५ अनुसुचित जातींचा समावेश.

II ग्रुपमध्ये १८ अनुसुचित जातींचाक समावेश.

III ग्रुपमध्ये २६ अनुसुचित जातींचा समावेश.

follow us

संबंधित बातम्या