बिहारमध्ये इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर ? आरजेडीमुळे काँग्रेसची वाट आणखी बिकट
Bihar Assembly Election 2025: तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाकडून काँग्रेसला अडचणीत आणले जात आहे. आरजेडीने काँग्रेसविरोधात उमेदवार दिलेत.

Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे (Bihar Assembly Election 2025) घमासान सुरू आहे. पक्षांकडून तिकीट वाटप सुरू असून, उमेदवारी अर्ज भरले आहेत. एकीकडे सत्ताधारी एनडीएमध्ये (NDA)जागा वाटपही झाले आहेत. तर विरोधी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीमध्ये जागा वाटपांचा घोळ अद्याप सुटलेला नाही. त्यात इंडिया आघाडीतील पक्ष एकमेंकाशी झुंजत आहेत का ? राजकीय प्रश्न आता बिहारी जनतेला पडलाय. कारण मुख्य विरोधी पक्ष असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीकडून (RJD)काँग्रेसला अडचणीत आणण्यात येत आहे. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होतील, असे बोलले जात आहे. परंतु ही राजकीय दुफळी असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. (India Grand alliance tensions amid stalled seat talks-rjd and congress)
या पाच मतदारसंघात उमेदवार
इंडिया आघाडी आणि एनडीएकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. सोमवारी राष्ट्रीय जनता दलाने (RJD) सोमवारी यादी जाहीर केलीय. त्यात आरजेडीने काँग्रेससह इतर मित्रपक्षांच्या उमेदवारांविरुद्ध उमेदवार जाहीर केले आहेत. पाच जागांवर आरजेडीने उमेदवार दिले आहेत. त्यात तीन उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध आहे. वैशाली मतदारसंघात अजय कुशवाह, लालगंजमधून शिवानी शुक्ला, कहलगावमध्ये रजनीश भारती, तारापूर आणि गौरा बोरममध्ये माजी राज्यमंत्री साहनी यांच्या पक्षाच्या विरुद्ध आरजेडीने उमेदवार दिला आहे. तसेच एका मतदारसंघातही राजदकडून उमेदवार जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे मित्रपक्षामध्ये लढत होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूक! नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का?, भाजपच्या डोक्यात काय? वाचा सविस्तर
राहुल गांधींच्या रॅलीचा फायदा काय ?
बिहारमध्ये काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वी रॅली काढली होती. त्या रॅलीला बिहारी जनतेने मोठ्या प्रतिसाद दिला होता. या रॅलीत इंडिया आघाडीचे नेतेही सहभागी झाले होते. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून रॅलीत सहभागी झाले होते. परंतु काँग्रेसविरुद्ध आरजेडीने उमेदवार दिले आहेत. त्यातून इंडिया आघाडीतील जागा वाटपांचा घोळ दिसून येत आहे. त्याचा फटका काँग्रेस व आरजेडीला दोघांना बसल्यास एनडीए आघाडीला थेट फायदा पोहोचू शकतो, असे बोलले जात आहे.