RJD 135 , VIP 16 तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागा; बिहारसाठी महाआघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल?

Bihar Assembly Election 2025  : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे

  • Written By: Published:
Bihar Assembly Election 2025

Bihar Assembly Election 2025  : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे तर दुसरीकडे आता महाआघाडीत देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या फॉर्म्युलानुसार, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आरजेडीला 135, व्हीआयपीला 16, काँग्रेसला 61 तर डाव्या पक्षांना 31 जागा मिळणार आहे. मात्र आता देखील काही जागांवरुन काँग्रेस आणि आरजेडीमध्ये वाद असल्याने अधिकृत घोषणा होण्यास वेळ लागत आहे.

व्हीआयपीसाठी 16 जागा

तर दुसरीकडे महाआघाडीत मुकेश साहनी (Mukesh Sahni) यांच्या व्हिआयपी (VIP) पक्षाला 16 जागा मिळणार आहे मात्र यापैकी निम्म्याहून अधिक जागांवर काँग्रेस आणि आरजेडीचे (Bihar Assembly Election 2025) उमेदवार निवडणूक लढवणार आहे मात्र त्यांचा चिन्ह व्हीआयपी पक्षाचा असणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, महाआघाडीमध्ये आतापर्यंत उपमुख्यमंत्रीच्या नावावर एकमत झालेला नाही.

NFDC-NFAI यांच्या विशेष सहकार्याने मोठ्या पडद्यावर पाहता येणार “अवघाचि संसार” चित्रपट

कधी होणार घोषणा?

काही जागांवर काँग्रेस (Congress) आणि आरजेडीमध्ये (RJD) वाद असल्याने जागा वाटपाची घोषणा होण्यास वेळ लागत आहे. माहितीनुसार, आरजेडीकडे असणाऱ्या जागांवर काँग्रेस दावा करत आहे तसेच काँग्रेसकडे असणाऱ्या काही जागांवर आरजेडी दावा करत असल्याने जागावाटपाची घोषणा होण्यास उशीर होत आहे. तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 101 आणि मुख्यमंत्री नितेश कुमार यांचा पक्ष जेडीयु 102 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

follow us