Telangana : देशातील अनेक भागांत लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. देशात तीन टप्प्यांत मतदान पार पडलं असून आज चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. अशातच हैद्राबाद मतदारसंघातील एका भाजप उमेदवाराने महिलांचे बुरखे हटवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजपचे उमेदवार माधवी लता (Madhavi Lata) यांच्यावर मलकपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (telangana case registered against madhavi latha bjp candidate from hyderabad lok sabha seat accused of removing burqa from the faces of women)
#WATCH | Telangana: BJP candidate from Hyderabad Lok Sabha constituency, Madhavi Latha visits a polling booth in the constituency. Voting for the fourth phase of #LokSabhaElections2024 is underway. pic.twitter.com/BlsQXRn80C
— ANI (@ANI) May 13, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता महिला मतदारांची विचारपूस करत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी माधवी लता मतदारांच्या ओळखपत्राची आणि त्यांच्या चेहऱ्याची ओळख करुन घेत आहेत. माधवी लता यांनी यावेळी महिलांना त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या बुरखा काढण्यासही सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकार एका मतदान केंद्रात सुरु असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मी विनंती करुन मतदारांची ओळख तपासली…
या व्हायरल व्हिडिओनंतर भाजपच्या उमदेवार माधवी लता यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मी एक उमेदवार असून कायद्यानूसार मला माझ्या भागातील मतदारांची ओळखपत्रे पाहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे मी मतदारांना नम्रपणे विनंती करुन ओळखपत्राविषयी विचारपूस केली आहे. या घटनेचा कोणाला मुद्दा बनवायचा असेल तर तो घाबरल्याचं स्पष्ट होत असल्याचं माधवी लता यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून आयपीसीच्या कलम १७१ सी, १८६, ५०५(१)(सी) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३२ अन्वये मलकपेठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलायं. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये हैदराबादच्या महत्त्वाच्या जागांवरही मतदान होत असून हैद्राबादमधून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिलीयं. तर एआयएमआयएमचे प्रमुख आणि विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसी हेही या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसकडून मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी दिलीयं.