Download App

Telangana Election : भाजपही तयारच! KCR विरोधात BRS चा माजी नेताच मैदानात

Telangana Elections : दक्षिणेकडील तेलंगणा राज्यासाठी भाजपने (Telangana Elections) खास प्लॅन तयार केला आहे. या राज्यात भारत राष्ट्र समितीला (BRS) जोरदार टक्कर देण्याच्या उद्देशाने प्रबळ उमेदवार रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार भाजपने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच या राज्यातही तीन खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज एकूण 55 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत वादग्रस्त विधाने करून कायम चर्चेत राहणारे टी. राजा यांना गोशामहल मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. हुजुराबाद आणि गजवेल या मतदारसंघांतून राजेंद्र इटाळा रिंगणात उतरणार आहेत. इटाळा हे आधी बीआरएसमध्ये होते. पण, आता थेट मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांना टक्कर देणार आहेत. भाजपने त्यांना इटाळा मतदारसंघात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे.

करीमनगर मतदारसंघातून खासदार संजयकुमार बंदी, बोथ मतदारसंघात खासदार सोनम बापू आणि अरविंद धर्मापुरी यांना कोरतला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने 15 ऑक्टोबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये काँग्रेसनेही प्रबळ उमेदवार दिल्याचा दावा केला आहे. निवडणुकीआधी जे विश्लेषण हाती आले आहे त्यानुसार राज्यात यंदा काँग्रेसला (Congress) अनुकूल वातावरण असल्याचे दिसत आहे. काही ओपिनियन पोलमध्ये तर काँग्रेसचे सरकार येईल असेही सांगितले जात आहे.

या राज्यात सत्ता बदल होऊन काँग्रेसला आश्वासक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने या राज्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंथ रेड्डी हे कोडांगल मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनी या राज्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

Assembly Elections 2023 : काँग्रेसही तयार, पहिली यादी जाहीर; कमलनाथ, CM बघेल मैदानात

मध्य प्रदेशात काँग्रेसचा आश्वासनांचा पाऊस

देशातील पाच राज्यांच्या निवडणुका (MP Election 2023) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. या राज्यात सध्या भाजप सत्तेत आहे. या राज्यातून भाजपाला सत्तेतून बेदखल करण्याचा प्लॅन काँग्रेसने तयार केला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मध्य प्रदेशातील जनतेला मोठं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यास 500 रुपयात गॅस सिलिंडर, महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. तसेच पहिली ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

Tags

follow us