Assembly Elections 2023 : काँग्रेसही तयार, पहिली यादी जाहीर; कमलनाथ, CM बघेल मैदानात

Assembly Elections 2023 : काँग्रेसही तयार, पहिली यादी जाहीर; कमलनाथ, CM बघेल मैदानात

Assembly Elections 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2023) कार्यक्रम निवडणूक आयोगान जाहीर केला. त्यानंतर राजकीय पक्षांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करण्यात मागे राहिलेल्या काँग्रेसने (Congress) अखेर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांतील निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश निवडणुकीसाठी पहिल्या यादीत 144 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडा येथून निवडणुकीच्या मैदाना उतरणार आहेत. तर छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण येथून काँग्रेसचे उमेदवार असतील.

छत्तीसगडसाठी काँग्रेसचे 30 शिलेदार रिंगणात

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव त्यांच्या पारंपारिक अंबिकापूर मतदारसंघातून निवडणूक लढताना दिसतील. तर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही नेत्यांतील वाद मिटविण्यात काँग्रेस नेतृत्वाला सध्या तरी यश मिळाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ताम्रध्वज साहू हे दुर्ग ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

तेलंगणा निवडणुकीसाठी 55 उमेदवार तयार

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 55 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या राज्यात सत्ता बदल होऊन काँग्रेसला आश्वासक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने या राज्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंथ रेड्डी हे कोडांगल मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मध्य प्रदेशात काँग्रेसचा आश्वासनांचा पाऊस

देशातील पाच राज्यांच्या निवडणुका (MP Election 2023) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. या राज्यात सध्या भाजप सत्तेत आहे. या राज्यातून भाजपाला सत्तेतून बेदखल करण्याचा प्लॅन काँग्रेसने तयार केला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मध्य प्रदेशातील जनतेला मोठं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यास 500 रुपयात गॅस सिलिंडर, महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. तसेच पहिली ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

MP Election 2023 : मध्य प्रदेशात काँग्रेसचं ठरलं! 500 रुपयात गॅस, महिलांना 1500

बुधनीत हायहोल्टेज लढत

मध्य प्रदेशातील बुधनी विधानसभा मतदारसंघात हायहोल्टेज लढत पाहण्यास मिळणार आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भाजपाच्या तिकीटावर पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनेही कंबर कसली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विक्रम मस्ताल यांना तिकीट दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube