MP Election 2023 : मध्य प्रदेशात काँग्रेसचं ठरलं! 500 रुपयात गॅस, महिलांना 1500

MP Election 2023 : मध्य प्रदेशात काँग्रेसचं ठरलं! 500 रुपयात गॅस, महिलांना 1500

MP Election 2023 : देशातील पाच राज्यांच्या निवडणुका (MP Election 2023) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. या राज्यात सध्या भाजप सत्तेत आहे. या राज्यातून भाजपाला सत्तेतून बेदखल करण्याचा प्लॅन काँग्रेसने तयार केला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मध्य प्रदेशातील जनतेला मोठं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यास 500 रुपयात गॅस सिलिंडर, महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. तसेच पहिली ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या गॅरंटीत नेमकं काय ?

काँग्रेसने मध्य प्रदेशातील नागरिकांना दिलेल्या गॅरंटीत महिलांना दरमहा दीड हजार रुपये, 500 रुपयात गॅस सिलिंडर, 100 युनिट वीजबिल माफ, 200 युनिटचे निम्मे वीजबिल, पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत, जुनी पेन्शन योजना लागू करणार, शेतीसाठी पाच हॉर्सपॉवर वीज मोफत, ओबीसींना 27 टक्के आरक्षण, पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागासाठी समान आर्थिक लाभ, जातनिहाय जनगणना करणार तसेच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube