Download App

‘BBC ही जगातील सर्वात भ्रष्ट संघटना’; भाजपचा आरोप

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : बीबीसीच्या (BBC) कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. मुंबई आणि दिल्लीतील बीबीसी वृत्तसंथ्येच्या कार्यालयात प्राप्तिकर अधिकारी (Income Tax) अधिकारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी सुरु आहे. दरम्यान, या करावाईनंतर देशात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. भारतात अघोषित आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केल्यानंर आता शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील बीबीसीवरील कारवाईवरून मोदी-शहांवर टीका केली आहे. दरम्यान, यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी बीबीसीवर निशाणा साधला आहे. ‘बीबीसी ही जगातील सर्वात भ्रष्ट संघटना असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे.

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बीबीसीवर टीका केली. प्राप्तिकर विभागाने कायद्याचे पालन करूनच बीबीसीच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. आज मोदी यांच्या नेतृत्वात भारताची चांगली प्रगती होत आहे. मात्र काही लोकांना हे आवडत नाही. बीबीसीला भारतात पत्रकारिता करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारतातील कायद्यांचे पालन करून ते त्यांची पत्रकारिता करू शकतात, असे गौरव भाटीया म्हणाले.

खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपने लावला जोर!

शिवाय, प्राप्तिकर विभागाच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधल्याबद्दल काँग्रेससह विरोधी पक्षांना देखील त्यांनी फटकारले. यावेळी त्यांनी ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही बीबीसीवर बंदी घातली होती अशी आठवण करुन दिली. काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी तसेच दहशतवाद्यांच्या बाजूने का उभा राहतो, असा सवालही त्यांनी केला.

भाटीया म्हणाले, भारतात प्रत्येक संस्थेला कायद्याचे पालन करून काम करण्याची संधी दिली जाते. मात्र त्यासाठी त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा. आयकर विभागाने बीबीसीवर केलेली कारवाई नियमांनुसार आणि घटनेनुसार केली जात आहे.’, असं भाटिया म्हणाले.

 

Tags

follow us