Download App

अखेर कांदा निर्यात बंदी उठवली! लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारचा निर्णय

गेली पाच महिन्यांपासून कांद्यावर निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे. लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेताल आहे.

  • Written By: Last Updated:

Lifts Onion Export Ban : सध्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जातात. आज मोदी सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्या निर्यातीवरील बंदी आज उठवली आहे. (Onion Export ) सुमारे 4 महिने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागल्यानंतर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 

5 महिन्याासून कांदा निर्यात बंदी

या निर्णयानुसार 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. परंतु, गेली 5 महिन्याासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचं काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.

कांदा निर्यात बंदी जानेवारीमध्येच मागे अथवा. खासदार विखे यांचे मोठे विधान

या देशात कांदा निर्यात होणार

सरकारने या निर्णयानुसार 6 देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये बांग्लादेश, युएई, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका हे देश आहेत. भारताचा या देशात कांदा निर्यात होणार आहे. तसंच, 2 हजार मेट्रीक टन पांढरा कांदा आखाती व काही युरोपियन देशात निर्यात केली जाणार आहे

 

कांदा निर्यातबंदी उठलीच नाही, फ्लेक्स लावून नुसतीच बनवाबनवी थोरातांचा विखेंना खोचक टोला

शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं

8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. ती 31 मार्चपर्यंत राहणार असं सांगितलं होतं. परंतु, मार्चलाही ही बंदी उठवली नाही. त्यामुळे मार्च महिन्याची वाट पाहून कांदा ठेवलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. सुमारे 5 महिन्यांनी ही निर्यात बंदी उठवली आहे. आता काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मोठ नुकसानही झालं आहे.

follow us