Download App

आजपासून बदलणाऱ्या नियमांमुळं थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

नवी दिल्ली : आज मार्च (March)महिन्याच्या पहिला दिवस आहे. आज 1 मार्च 2023 पासून आपल्या बँक (Bank)आणि पैशांशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. चालू महिन्यात सोशल मीडिया (Social Media), बँक कर्ज (Bank Loan), एलपीजी सिलिंडर (LPG Cylender), बँकांच्या सुट्ट्या (Banks Hollydays)आदींसह विविध अनेक महत्त्वाचे बदल दिसतील. त्याचवेळी, ट्रेनच्या वेळापत्रकात (Train TimeTable)देखील बदल होऊ शकतात.

12 दिवस बॅंका बंद
मार्च महिन्यात 12 दिवस बॅंका बंद (March Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. रिझर्व्ह आरबीआयनं (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मार्च महिन्यातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. आरबीआयच्या (RBI) कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँक सुट्ट्या असतील. राज्य आणि तेथील सणानुसार या सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतो.

शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना तो आग्रह केला नसता तर….

जास्त रक्कम मोजावी लागणार
आरबीआयनं यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर विविध बँकांनी त्यांचे एमसीएलआर (MCLR) दर वाढवले आहेत. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणारंय. एमसीएलआरच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणारंय. आता लोकांना बँकांना ईएमआय देताना जास्त रक्कम मोजावी लागणारंय.

LPG च्या दरात वाढण्याची शक्यता
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी दर प्रत्येक महिन्यात बदलत असतात. गेल्या महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळं मार्च महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा ताण पडणारंय.

ट्रेनच्या वेळेत बदल
फेब्रुवारी महिन्यानंतर आता उन्हाळा सुरु झालाय. मार्चमध्ये रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. 5000 मालगाडी आणि प्रवाशी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलाय.

सोशल मीडिया बदल
मार्च महिन्यात सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी काही गोष्टींमध्ये होण्याची शक्यता आहे. सरकारनं अलिकडंच आयटी नियमांत बदल केले आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आता देशभरात नवीन नियमांचं पालन करावं लागणारंय.

Tags

follow us