Download App

Rahul Gandhi : ‘पनौती’ शब्द निवडणूक आयोगालाही खटकला; BJP च्या तक्रारीची 24 तासांत दखल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीला 24 तास होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने उत्तर मागितले आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी गांधी यांना (शनिवारी, 25 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत उत्तर न दिल्यास किंवा दिलेल्या उत्तराने आयोगाचे समाधान न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. (The Election Commission on Thursday issued a notice to Congress leader Rahul Gandhi over his ‘panauti’ word)

निवडणूक आयोगाने (Election Commission) जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरणे हे एका राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला शोभणारे नाही. शिवााय गेल्या 9 वर्षात 14,00,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा दावा केला आहे, त्यातही तथ्य नाही. सोबतच ते आदर्श आचारसंहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे, असे आयोगाने या नोटिसीत म्हटले आहे. या सगळ्या तक्रारीवर आपले काय म्हणणे आहे, याबाबत शनिवारी (शनिवारी, 25 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उत्तर द्यावे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यानंतर राजस्थानमधील प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका करताना ‘पनौती’ हा शब्द वापरला. “आपल्या खेळाडूंनी वर्ल्डकप जिंकला असता पण अहमदाबादच्या स्टेडियममध्ये बसलेल्या पनवतीमुळे आपण विश्वचषक जिंकू शकलो नाही, असे ते म्हणाले”. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची जात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली होती, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

पनवती शब्दावर आक्षेप, राहुल गांधी, खर्गेंविरोधात EC मध्ये तक्रार, खासदारकी धोक्यात येणार?

गांधी आणि खर्गेंच्या या वक्तव्यांवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गांधींचे वक्तव्य अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचे भाजपने म्हटले. खर्गे यांनी चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे असाही दावा केला. या दोन्ही विधानांनंतर भाजप नेते राधामोहन अग्रवाल आणि ओम पाठक यांनी गांधी आणि खर्गेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. याच तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने 24 तासांत राहुल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल यांनी राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

लाच म्हणून चक्क ‘विमानं’ स्वीकारली अन् 90 लाख रुपये भाड्याने दिले! केंद्रातील अधिकाऱ्याचा प्रताप

भाजप नेते काय म्हणाले?

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी हताश झाले आहेतच, पण, त्यांचे वक्तव्य म्हणजे, मानसिक अस्थिरतेचे लक्षण आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोनिया गांधींनी त्यांना मौत के सौदारग म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. आता राहुल गांधींनी पंतप्रधानांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून आपला खरा रंग दाखवला आहे, असाही टोला हाणला. शिवाय मोदींच्या घांची समाजाचा 1999 मध्ये ओबीसी वर्गात समावेश करण्यात आला होता. 2001 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. भाजपने आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

follow us

वेब स्टोरीज