पनवती शब्दावर आक्षेप, राहुल गांधी, खर्गेंविरोधात EC मध्ये तक्रार, खासदारकी धोक्यात येणार?
BJP complaint against Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजस्थानमधील एका प्रचार सभेत जनतेला संबोधित करताना पनवती हा शब्द वापरला. पनवती अहमदाबादच्या स्टेडियममध्ये बसलेल्या पनवतीमुळं आपण २०२३ चा विश्वचषक जिंकू शकलो नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावरून भाजपने काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. अनेक भाजप नेते राहुल गांधींसह कॉंग्रेसवर टीका करत आहेत. दमम्यान, आता भाजपने (BJP) त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
2024 चा भाजपचा अजेंडा ठरला, राम मंदिराच्या पोस्टरवर मोदी झळकले
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यानंतर राहुल गांधींनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका करतांना पनवती’ हा शब्द वापरला. त्यांच्या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गांधींचे वक्तव्य अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचे भाजपने म्हटले आहे. राहुल गांधींची टीका भाजपला चांगलीच जिव्हारी लागली. याप्रकरणी भाजपने आज निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे डीजीसीए तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या काय आहे प्रकरण
राहुल गांधींवर भाजपची टीका
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी हताश झाले आहेतच, पण, त्यांचे वक्तव्य म्हणजे, मानसिक अस्थिरतेचे लक्षण आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोनिया गांधींनी त्यांना मौत के सौदारग म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. आता राहुल गांधींनी पंतप्रधानांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून आपला खरा रंग दाखवला. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल यांनी राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची जात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली होती, असं वव्तव्य त्यांनी केलं होतं. या विधानावर भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते राधामोहन अग्रवाल आणि ओम पाठक यांनी ही तक्रार केली आहे.
मोदींच्या घांची समाजाचा 1999 मध्ये ओबीसी वर्गात समावेश करण्यात आला होता. 2001 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, भाजपने आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्गे यांनी चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टीकेमुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना शिक्षाही सुनावली होती. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यामुळं हे प्रकरणही न्यायालयाच्या दारात गेल्यास त्यांची खासदारकी पुन्हा धोक्यात येण्याची शक्यता आहे.