मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या (Indur) इंदूर खंडपीठाने धार भोजशाळा प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भोजशाळेला मंदिर म्हणून घोषित करून हिंदू पक्षाची मागणी मान्य करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला मशिदीसाठी स्वतंत्र भूखंड देण्याचाही निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने सरकारला मशिदीसाठी स्वतंत्र भूखंड देण्याचे निर्देश दिले आहेत. भोजशाळेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे संरक्षण सुरूच राहील, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
प्रशासन सतर्क
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंदूर आणि धार जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. आज शुक्रवार असल्याने नमाजामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील झाली आहे. मुस्लिम समाज भोजशाळा परिसरात शुक्रवारची नमाज अदा करतो. या ठिकाणी आणि संवेदनशील भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
