Vivek Agnihotri Legal Notice to Mamata Banergee : चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banergee) यांना कायदेशीर नोटीस (Legal Notice)पाठवली आहे. ममता बॅनर्जी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. केरळ स्टोरीची तुलना काश्मीर फाईल्सशी (the kashmir files)केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याचवेळी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचाही उल्लेख केला होता.
Maharashtra Politics : राष्ट्रवादी खरंच साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष? वाचा ही माहिती…
याविषयीच अग्निहोत्री म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी द काश्मीर फाईल्स आणि बंगालमध्ये झालेल्या नरसंहारावर बनत असलेल्या त्यांच्या पुढील चित्रपटावर आरोप केले आणि त्याला प्रपोगंडा असं म्हटलं आहे. हे खूपच वेदनादायी असून त्यामुळेच आपण मुख्यमंत्री बॅनर्जींना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या कायदेशीर नोटीसमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी ममता बॅनर्जींनी केलेल्या टीकेवर केलेल्या आरोपामध्ये तथ्य काय आहे? याचं उत्तर मागितलं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अग्निहोत्री म्हणाले की, बऱ्याचदा मी गप्प होतो.
कोणताही मुख्यमंत्री, मग तो दिल्लीचा मुख्यमंत्री असो, किंवा मोठे पत्रकार, राजकारणी असो, ते म्हणायचे की, द काश्मीर फाईल्स हा एक प्रपोगंडा चित्रपट आहे. आता पुरे झाले.
या चित्रपटातील कोणता संवाद, कोणता संवाद कोणता सीन खोटा आहे? हे सिद्ध करुन दाखवा असं आव्हानंच अग्निहोत्री यांनी दिलं आहे. आमच्या बाजूने आम्ही लढा देऊ आणि कठोर कायदेशीर कारवाई करु असंही ते म्हणाले.