The poster of ‘Vande Bharat’ was affixed to Khidkyawar MP, RPF filed a crime : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळला वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी येथील काँग्रेस वादात सापडली आहे. 25 एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी तिरुवनंतपुरम ते कासरगोड दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. पलक्कडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पहिल्या प्रवासादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या खिडक्यांवर पलक्कडचे खासदार व्हीके श्रीकंदन यांचे पोस्टर चिकटवले. मात्र, नंतर आरपीएफ जवानांनी हे पोस्टर्सही हटवले. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते आणि आरपीएफ जवानांमध्ये वादावादीही झाली. दरम्यान, आता पोस्टर चिकटवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून चौकशी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
शोर्णूर येथे थांबा दिल्याबद्दल खासदाराच्या अभिनंदनाचे पोस्टर
या गाडीला पूर्वनिश्चित मार्गानुसार शोर्नूर येथे थांबा नव्हता. त्यामुळे पलक्कडच्या खासदारांर व्हीके श्रीकंदन यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून शोर्नूर येथे थांबा देण्याचे आवाहन केले. यानंतर शोर्नूर रेल्वे स्थानकावरही या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर तिरुअनंतपुरम आणि कासारगोडमध्ये धावणाऱ्या या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी काल जेव्हा रेल्वे स्थानकात आली तेव्हा घडलेल्या एका प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली.
पलक्कडचे खासदार व्ही.के.श्रीकंदन यांनी शोर्णूर रेल्वे स्थानकावर रेल्वेला थांबा मिळवून दिला. त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोर्णूर इथे ही ट्रेन आली असता या गाडीच्या काचांवर व्ही.के.श्रीकंदन यांच्या अभिनंदनाचे पोस्टर चिकटवले. नव्या कोऱ्या गाडीवर हे पोस्टर चिकटवल्याने रेल्वे विद्रुप दिसत होती. रेल्वे पोलीस दलाने यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
#WATCH | Congress workers pasted posters of Palakkad MP VK Sreekandan on the windows of a wagon of Vande Bharat Express when the train reached Shoranur in Kerala's Palakkad yesterday. Railway Protection Force has registered a case, investigation underway pic.twitter.com/rgqocYIqid
— ANI (@ANI) April 26, 2023
वंदे भारत ट्रेन केरळमधील या 11 जिल्ह्यांना कव्हर करेल
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान धावणार असल्याची माहिती आहे. या ट्रेनला मंगळवारी तिरुअनंतपुरम रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठाणमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड यासह 11 जिल्ह्यांचा समावेश करेल.
Weather Update : राज्यात पुढील चार दिवस पाऊस थैमान घालणार, कमी दाबाचा पट्टा सक्रीय
केरळच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे भाडे किती आहे?
कासारगोड-तिरुवनंतपुरम दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 26 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजता सुटणार असल्याची माहिती आहे. रात्री 10.50 वाजता तिरुअनंतपुरमला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला 16 डबे आहेत. या रेल्वेचा वेग ताशी 110 किमी ते 130 किमी पर्यंत आहे. तिरुअनंतपुरम कासारगोड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे भाडे चेअर कारसाठी रु. 1590 आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी रु. 2880 आहे.