Gold Price Hike : लग्नसराई सुरू झाली त्याच काळात सोने, चांदीचे दर रोज नव नवे उच्चांक गाठत असल्याने वधु-वरांकडील पालकांवर सोयरिक जुळवण्यापेक्षा सोयरिक जुळल्यानंतर नवं वधूला दाग-दागिने खरेदी करतात. (Price) त्यामधे भाव वाढीने प्रचंड तारांबळ बघायला मिळते आहे.
हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. जिथे दोन ते पाच तोळे दागिन्यांची खरेदी करायचे तिथे आता तोळाभर दागिन्यांच्या खरेदीवरच गरज भागवावी लागत असल्याने सोने चांदी दर वाढीने नवं वधुंचा मात्र हिरमोड होताना दिसून येत आहे.
मागील काही दिवसांत सोने- चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा ८८ हजार, तर चांदीच्या दरानेप्रति किलो एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सोने दर ९५ हजार रुपये प्रति तोळापर्यंत जाण्याचा अंदाज सराफ बाजारातील व्यापारी वर्तवत आहेत. वाढत्या आणि अस्थिर दरांमुळे सराफा बाजारासह ग्राहकांमध्ये सोने खरेदी- विक्री विषयी संभ्रमावस्था आहे.
आज जाहीर होणार वाळू धोरण; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, अंमलबजावणी कधीपासून होणार?
रोज वाढणाऱ्या तसेच अस्थिर दरांमुळे सराफ बाजारात क्रेडिट ऐवजी रोख व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर लग्न सराईत वधूसाठी मंगळसूत्र, गंठण, नवऱ्या मुलासाठी सोन्याची अंगठी खरेदी केली जाते. मात्र, तोळाभर सोने खरेदी करण्यास जवळजवळ लाखभर रुपये जात असल्याने वधू-वर पक्षांकडून सोन्याची मर्यादित खरेदी केली जात आहे.
गेल्या सव्वा महिन्यात सोन्याच्या दरात प्रति तोळा १२ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरानेही ११ हजार रुपयांची उसळी मारली आहे. चांदीचे दर १ लाख आठ हजार रुपये प्रति किलोवर पोचले आहेत. २० फेब्रूवारीला सोन्याचे दर ८७ हजार रुपये प्रतितोळा होते. तर चांदीचे आता १ लाख ८ हजार रुपये प्रतितोळा आहेत.
अमेरिकेतील ट्रम्प सरकारचे निर्णय, शेअर बाजारातील अस्थिरता, जागतिक बाजार, विविध देशांतील बँका सोने खरेदी करून त्यांचा साठा करून ठेवण्यास देत असलेले प्राधान्य आदी कारणांमुळे हे दर वाढत असल्याचे सराफा बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.