CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच बोर्डाचा 2023 निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाकडून येत्या काही दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत बोर्डाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या. दोन्ही टर्मचा स्वतंत्र निकाल जाहीर झाला. मात्र यावर्षी एकाच वेळी परीक्षा झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. CBSE इयत्ता 10वी, 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresuts.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. यासोबतच उमेदवार फक्त डिजीलॉकरद्वारे एसएमएस देखील तपासू शकतात.
CBSE बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या स्टेप फॉलो कराव्यात
CBSE बोर्डाचा 10वी, 12वीचा निकाल पाहण्यासाठी सर्व प्रथम विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. नंतर results.cbse.nic.in. या लिंकवर क्लिक करा. नंतर आवश्यक लॉगिन तपशील प्रविष्ट करा. सबमिटवर क्लिक करा. तुमच्या निकालासह एक नवीन विंडो उघडेल.निकाल डाउनलोड करा.
अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले
CBSE ने 14 फेब्रुवारी ते 21 मार्च आणि 5 एप्रिल या कालावधीत 10 वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचे आयोजन केले होते. आणि आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करणार आहे. निकालाच्या निमित्ताने गेल्या वर्षीच्या निकालावर नजर टाकली तर 2022 मध्ये आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार 12वीचा निकाल 98 टक्क्यांहून अधिक लागला होता. ही टक्केवारी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक होती.