SC on Hemant Suren Bail : जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे, हे तत्व मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) मनी लाँडरिंग प्रकरणांना देखील लागू होतं. उच्च न्यायालयाचा निर्णय नाकारताना झारखंडचे मुख्यमंत्री (Hemant Suren ) हेमंत सोरेन यांचे कथित सहकारी प्रेम प्रकाश यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन दिल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.
मोठी बातमी : हेमंत सोरेन तिसऱ्यांदा होणार झारखंडचे मुख्यमंत्री; 7 जुलै रोजी घेणार शपथ
भारतीय न्याय प्रक्रियेत जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास हा अपवाद आहे, असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. हा नियम पीएमएलएमध्येही लागू होईल. याचा अर्थ, ‘जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे’ हे तत्व देखील घटनेच्या कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे असंही न्यायालयाने म्हटल आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २८ जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडची सूत्रं हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली होती, जी आता खरी ठरली. त्यांनी चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.