मोठी बातमी : हेमंत सोरेन तिसऱ्यांदा होणार झारखंडचे मुख्यमंत्री; 7 जुलै रोजी घेणार शपथ

  • Written By: Published:
मोठी बातमी : हेमंत सोरेन तिसऱ्यांदा होणार झारखंडचे मुख्यमंत्री; 7 जुलै रोजी घेणार शपथ

Jharkhand governor invites Hemant Soren to form govt, swearing in on July 7 :  झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील JMM ला झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून, हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्री विराजमान होणार आहेत. येत्या 7 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

हेमंत सोरेन यांची पाच महिन्यांनी तुरुंगातून सुटका  

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांना अटक झाली होती. त्यानंतर ते जवळपास 5 महिने तुरूंगात होते. उच्च न्यायालयाने 28 जून रोजी त्यांची जामीनावर सुटका केली. त्यापूर्वी म्हणजेच अटक होण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी 31 जानेवारी रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत चंपाई सोरेन यांच्याकडे राज्याची धूरा संभाळण्यासाठी दिली होती.

म्हणून चंपाई सोरेन यांनी दिला राजीनाम

हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर राज्याची धूरा सांभळण्याची जबाबदारी चंपाई सोरेन यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र, आता हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्याने आमच्या आघाडीने हेमंत सोरेन यांना नेते म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण राजीनाम देत असल्याचे चंपाई यांनी काल सांगितले होते.

मोठी बातमी : वसंत तात्यांचा ‘वंचित’ला गुड बाय; ठाकरेंचं शिवबंधन बांधण्याचा मुहुर्त ठरला!

हेमंत सोरेन यांच्या आरोप काय?

हेमंत सोरेन यांच्यावर 31 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची 8.86 एकर जमीन बेकायदेशीरपणे संपादित केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी ईडीने कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर 28 जून रोजी उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube