चंपाई सोरेन यांचा आज शपथविधी; माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं अटकेला आव्हान…
Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीकडून सोरेन यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता मुख्यमंत्रिपदी गटनेते चंपाई सोरेन (Champai Soren) विराजमान होणार असून आज त्यांचा शपथविधी होणार आहेत. तर दुसरीकडे हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
अजितदादांची जागा रोहित पवार घेत आहेत का? ‘बारामतीमध्येच’ मिळाले स्पष्ट उत्तर
कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यांच्यावर कथित जमीनीसंदर्भात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, माझ्याविरोधात कोणताही पुरावा नसून तरीही मला ईडीकडून अटक करण्यात आल्याचं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Budget 2024 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी; पंतप्रधानांच्या देशवासीयांना शुभेच्छा!
हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु होती. भाजपच्या अनेक नेत्यांकडून झारखंडमध्ये बिहारचा राबडीदेवी पॅटर्न होणार असल्याचा दावाही करण्यात येत होता. मात्र, हेमंत सोरेन यांच्यानंतर चंपाई सोरेन यांना विधी मंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर हेमंत सोरेन यांच्यानंतरचा मुख्यमंत्री चंपाई सोरेनच होणार असल्याचं स्पष्ट झालं.
Union Budget 2024 : बजेट सादर करताच अर्थमंत्र्यांच्या नावे मोठे रेकॉर्ड; चिदंबरमही पडणार मागे
हेमंत सोरेन यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी कारवाईची टांगती तलवार होती. त्यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर ते संपर्काबाहेर होते. ते दिल्लीत आल्यानंतर कुठे गेले याबाबत कोणालाच कल्पना नव्हती. त्यांच्या सर्व स्टाफचे फोनही बंद लागत असल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय त्यांचे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नेमके गेले कुठे असा सवाल विचारला जात होता. अखेर ते झारखंडमध्ये दाखल होताच ईडीकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे चंपाई सोरेन आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून पुढील दहा दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. तर हेमंत सोरेन यांनी माझ्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेवर आज न्यायालयात काय निर्णय घेतला जाणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.