Hemant Soren यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जमीन खरेदी घोटाळ्या प्रकरणी जामीन मंजूर

Hemant Soren यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जमीन खरेदी घोटाळ्या प्रकरणी जामीन मंजूर

Hemant Soren Bail granted in land scam case by high court : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून (high court) जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामध्ये त्यांना जामीन मंजूर (Bail granted) झाला आहे. सोरेन यांना 31 जानेवारीला सक्तवसुली संचलनालयाकडून जमीन खरेदी घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली होती.

“अध्यक्ष महाराज, बजेट लीक झालं”; ‘त्या’ आरोपावर अध्यक्षांची तंबी अन् पटोलेंची माघार

सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यानंतर च पक्षातील वरिष्ठ नेते चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांच्यासह झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाला देखील दिलासा मिळाला आहे.

धक्कादायक! वाळू माफियांवर मंत्र्यांचं अजब उत्तर, थोरात-विखे पाटीलांची सभागृहात खडाजंगी

झारखंडमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्या आहेत. तसेच त्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाल्या होत्या.

दरम्यान अशा पद्धतीने अटक होणारे सोरेन हे झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. या अगोदर हेमंत सोरेन यांचे वडिल शिबू सोरेन आणि त्यानंतर मधु कोडा यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती. सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. या अटकेदरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं होतं. तर लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने विरोधकांकडून या अटकेवर जोरदार टीका करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज