“अध्यक्ष महाराज, बजेट लीक झालं”; ‘त्या’ आरोपावर अध्यक्षांची तंबी अन् पटोलेंची माघार

“अध्यक्ष महाराज, बजेट लीक झालं”; ‘त्या’ आरोपावर अध्यक्षांची तंबी अन् पटोलेंची माघार

Maharashtra Assembly Session Live : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी होताना दिसत आहेत. या अधिवेशनात चर्चेदरम्यान असाच एक प्रसंग घडला ज्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांना मध्येच खाली बसावं लागलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना मध्येच थांबवलं त्यामुळे नाना पटोलेंना आपलं बोलणं थांबवत खाली बसावं लागलं. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात खास चर्चा सुरू झाली आहे. आता हा प्रकार नेमका काय होता हे जाणून घेऊ या…

पटोले म्हणाले, राज्याचं आज बजेट आहे. या बजेटमध्ये काय काय येणार हे आज पेपरमध्ये आलंय आणि टिव्हीवर सुद्धा दाखवण्यात आलं आहे. याचा अर्थ असा आहे की हे बजेट लीक झालं आहे. नीट परीक्षेचे पेपर जसे फुटले तसे बजेटही फुटले आहे. यातली वस्तुस्थिती सरकारने स्पष्ट करावी. बजेट लीक होत असेल तर हा गोपनियतेचा भंग आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला.

धक्कादायक! वाळू माफियांवर मंत्र्यांचं अजब उत्तर, थोरात-विखे पाटीलांची सभागृहात खडाजंगी

यानंतर नार्वेकरांनी पटोलेंना मध्येच थांबवत नाना अजून बजेट सादरच झालेलं नाही. मग हे सत्य आहे की खोटं आहे हे कसं तपासणार. तुमच्याकडे बजेट आलं आहे का असा प्रश्न करत बजेट मांडल्यानंतर हा मुद्दा मांडा असे नार्वेकरांनी ठणकावले. त्यानंतर आम्हाला नंतर बोलण्याची परवानगी द्या असे म्हणत नाना पटोलेंनी खाली बसणे पसंत केले.

वाळू धोरणावर खडाजंगी

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी वाळू धोरण फसल असून मंत्री मोहदयांनी याबद्दल जाहीर कबूली दिली आहे असा थेट आरोप करत तुम्ही 600 रुपयात कशी वाळू देणार आहात हे एकदा स्पष्ट करा असा प्रश्नही उपस्थित केला. तसंच, जर ट्रक पकडला तर 2 लाख रुपये दंड होत असेल तर तो कशातून भरणार अस म्हणत यामध्ये मोठ्या प्रमाणत टोळ्या तयार झाल्या आहेत असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज