महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅलीप्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की राजकारण आणि धर्म जेव्हा वेगळं केलं जाईल. तेव्हा हे सगळं बंद होईल.
न्यायमूर्ती जोसेफ यावेळी म्हणाले की भडकाऊ भाषण हे एक दुष्टचक्र आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देतील. सरकारने कारवाई सुरू करावी. सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. म्हणूनच सर्व काही घडत आहे. असे ताशेरे त्यांनी राज्य सरकारवर केले.
यावेळी न्यायमूर्तीनी सॉलिसीटर जनरल यांनाही सुनावले, ते म्हणाले की राज्य सरकार कोणती कारवाई करणार आहात, हे सांगा. पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सकल हिंदू समाजाच्या वकिलाने युक्तिवाद करताना त्यांच्या संघटनेला धार्मिक मिरवणूक काढण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयात स्पष्टीकरण दिले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना प्रश्न उपस्थित केला की, मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, पण अशा रॅलीतून तुम्हाला देशाचा कायदा मोडण्याची परवानगी दिली जाऊ शकते का?
त्याचवेळी न्यायालयाने हिंदू समाजाच्या वकिलाला सांगितले की, आम्ही तुमच्यावर अवमानाची कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत पक्षकारांना उपस्थित राहण्याची परवानगी देत आहोत, मात्र याचा अर्थ अवमानाची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात यावी, असा होत नाही.
Fact check : खरचं राहुल गांधींनी सावरकरांविषयीचे ट्विट्स डिलीट केलेत का?
अशा घटनांवर चिंता व्यक्त करताना न्यायमूर्ती नागरत्न म्हणाले की, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हा प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू, वाजपेयी यांच्यासारखे वक्ते आपल्याकडे होऊन गेले. नेहरूजींचे ते मध्यरात्रीचे भाषण बघा, पण आता सगळीकडून अशी आक्षेपार्ह विधाने येत आहेत.