Fact check : खरचं राहुल गांधींनी सावरकरांविषयीचे ट्विट्स डिलीट केलेत का?

Fact check : खरचं राहुल गांधींनी सावरकरांविषयीचे ट्विट्स डिलीट केलेत का?

नवी दिल्ली – मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह ट्विट्स डिलीट केल्याची सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशभरात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या भाषणावरुन माफी मागावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून केली जात होती. यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत ‘मी सावरकर नाही गांधी आहे, माफी मागणार नाही’ असे विधान केले होते. राहुल गांधींच्या या विधानावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडली होती. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ‘सावरकर आमचे दैवत आहेत, आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही’ असे राहुल गांधींना सुनावले होते.

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानमुळे गेल्या काही दिवसांपासून वाद वाढत चालला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावरकरांविषयी वारंवार वक्तव्य करणे आणि त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. तसेच या वादामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते अशी शक्यता सांगितली होती. काँग्रेसने दिल्लीत देशातील विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या विधानावरुन राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर सावरकरांच्या नातवाने खटला भरण्याची धमकी दिली होती. सावरकरांच्या नातवाच्या त्या विधानानंतर राहुल गांधींनी वीर सावरकरांवरील सर्व ट्विट हटवल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर पोटनिवडणूक कधी ? ; निवडणूक आयुक्तांनी दिले ‘हे’ उत्तर

तथापि, राहुल गांधींच्या’कॅश्ड ट्विट्स’मध्ये ऑनलाइन तपासले, तेव्हा आम्हाला आढळले की राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत एकही ट्विट हटवलेले नाही. ज्या कालावधीत ऑनलाइन दावे म्हणतात की त्यांनी सावरकरांवरील ट्विट हटवले. तुम्ही राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटचे कॅश केलेले ट्विट तपासले तरी तुम्हाला वीर सावरकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हटवलेले काहीही सापडणार नाही.

तथापि, राहुल गांधींच्या’कॅश्ड ट्विट्स’मध्ये ऑनलाइन तपासले, तेव्हा आम्हाला आढळले की राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत एकही ट्विट हटवलेले नाही. OpIndia ने प्रकाशित केलेल्या अहवालनुसार राहुल गांधींच्या एकूण ट्विटची संख्या 6786 होती. राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत एकही ट्विट हटवलेले नाही असे अहवाल पुष्टी करते.

राहुल गांधींनी यापूर्वी सावरकरांबद्दल काही ट्विट केले आहे का? असे OpIndia ने Google कॅशेमध्ये तपासले. परंतु त्यामध्ये असे कोणतेही ट्विट त्यांना सापडले नाही. त्यामुळे यातून असा निष्कर्ष काढू शकतो की राहुल गांधींनी यापूर्वी सावरकरांबद्दल काहीही ट्विट केले नव्हते, आणि म्हणूनच लोकांना असे ट्विट सापडत नाहीत. यामुळे लोकांना की राहुल गांधींनी ते ट्विट हटवले आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी सावरकरांवरील ट्विट हटवल्याची अफवा असल्याचे दिसत आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल बहुतांश विधाने जाहीर सभेत किंवा पत्रकार परिषदेत केली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube